Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरआजपासून शनीदर्शन खुले

आजपासून शनीदर्शन खुले

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishignapur

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले शनीशिंगणापूरचे शनीमंदीर आजपासून खुले होत आहे. दर्शन खुले करण्यात आले असले तरी सर्वांसाठी दर्शन चौथर्‍याखालूनच घेऊ देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी विश्वस्त मंडळास दिली आहे.

- Advertisement -

शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे, गेल्या दीड वर्षापासून मंदीर बंद असल्याने भाविकांची संख्या नसल्याने छोटे-मोठ्या व्यावसायीकांचे प्रचंड हाल होत होते. हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. घटस्थापनेच्या दिवशी पहाटेच्या आरतीनंतर शनि मंदीर सुरू होत आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार स्वयंभू शनि मूर्तीला स्पर्श नको असल्याने सर्व भाविकांना चौथर्‍या खालूनच दर्शन घेण्याची सक्ती केली आहे. अन्य नियमांची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विश्वस्त मंडळास दिल्या आहेत.

शिर्डीत घेतलेल्या बैठकीला शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर ,कार्यकारी अधिकारी जी .के. दरदले उपस्थित होते. करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून देवस्थान बंद असल्याने येथील व्यवसायीकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले होते जरी देवस्थान सुरू झाले असले तरी करोना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे.भाविक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या