Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिंगणापुरात सोमवारपासून दररोज मध्यान्ह आरतीही होणार

शिंगणापुरात सोमवारपासून दररोज मध्यान्ह आरतीही होणार

सोनई |वार्ताहर| Sonai

शनिशिंगणापुर येथे सध्या पहाटे साडेचार व सायंकाळी सुर्यास्तावेळी आरती सोहळा होतो. आता नव्याने रोज दुपारी बारा वाजता आरती सोहळा व देवाला नैवेद्य उपक्रम सोमवार दि.1 नोव्हेंबर पासून सुरु करण्या चा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

- Advertisement -

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन निर्णय जाहीर करण्यात आला.

आतापर्यंत पहाटे साडेचार व सायंकाळी सुर्यास्तावेळी आरती होत असते. या आरतीचा मान एका भाविकाला देवून शनिवारी एकवीस हजार तर इतर दिवशी अकरा हजार रुपये देणगी घेतली जाते. भाविकांतून दुपारची आरती सुरु करावी अशी मागणी होती. ही मागणी लक्षात घेवून देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला आहे.

बैठकीला अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त मंडळ,सर्व विभाग प्रमुख तसेच कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे उपस्थित होते. सोमवारी दुपारी बारा वाजता नव्याने सुरु होत असलेल्या मध्यान्ह आरती सोहळ्याची भाविकांना उत्सुकता लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या