Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधशेन वॉर्न यांना हृदय आघात...का?

शेन वॉर्न यांना हृदय आघात…का?

क्रिकेट विश्वातील जादूगर फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे अचानक निधन त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. मैदानात वॉर्न अत्यंत शिस्तीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत असत. मात्र मैदानाबाहेर त्यांचे जगणे स्वच्छंदी होते. कोणताही आडपडदा न ठेवता मनाप्रमाणे वागणेे त्यांना आवडत असे. त्यांनी अवेळी घेतलेली एक्झिट अनेकांना धक्का देणारी ठरली. त्यांच्या डाव्या हातावरील हृदय रेषेत दोष असला तरी त्यांची दोन्ही हातावर आयुष्य रेषा खणखणीत होती. म्हणूनच वॉर्न यांचे निधन हा अपघात आहे, असे निदान काढता येईल. त्यांच्या हाताच्या विश्लेषणातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो.

शेन कीथ वॉर्न यांचा जन्म 13 सप्टेंबर 1969 रोजी फर्नट्री गली (व्हिक्टोरिया) येथे झाला. उजव्या हाताच्या या लेग स्पिनरने जगातील अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवले. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळख. 2000 मध्ये विस्डेनने त्यांची शतकातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश केला होता. यावरून त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची कल्पना यावी. कसोटी क्रिकेटमध्ये 145 सामन्यांत 25.41 धावांच्या सरासरीने 708 बळी, 3 हजार 154 धावा, 125 झेल तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 194 सामान्यात 293 बळी, 1 हजार 18 धावा व 80 झेल अशी त्यांची कामगिरी. व्हिक्टोरियामध्ये जन्मलेल्या या गोलंदाजाने फेब्रुवारी 1991 मध्ये ऑस्ट्रेलियातील त्याच्या मूळ राज्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 11 महिन्यात पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध निवड झाली. त्यानंत शेन वॉर्न या गोलंदाजाने मागे वळून पाहिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या अनेक विजयांत मोठा वाटा उचलला. फिरकी गोलंदाजीला त्यांनी पुन्हा सुवर्णकाळ मिळवून दिला. भारतातील आयपीएल स्पर्धाही त्यांनी गाजविली.

- Advertisement -

शेन वॉर्न यांच्या उजव्या व डाव्या हातावरील मस्तक रेषा आयुष्य रेषेपासून अर्धा सेंटिमीटर दूर उगम पावते. त्यामुळे शेन वॉर्न हे अत्यंत हुशार व बुद्धिमान होते. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा आपल्याच तत्वाला कायम चिटकून होते. दुसर्‍याचे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत ते कधीही नव्हते. आयुष्य रेषा व मस्तक रेषेत उगम स्थानी गुरु उंचवट्यावर एकमेकात अंतर ठेऊन उगम पावत असेल किंवा त्यांचा उगम स्वतंत्र होत असेल तर असे लोक दुसर्‍याच्या अधिपत्याखाली आपले काम करीत नाहीत. स्वछंद राहणे त्यांना पसंद असते. दोन्ही हाताच्या मस्तक रेषा यांना चंद्र ग्रहावर उतरल्यानंतर द्विशाखी झाल्या आहेत. त्या चंद्र ग्रहावर हाताच्या बाहेरपर्यंत गेल्यामुळे वॉर्न यांची क्रीडा विश्वातील प्रतिभा नाविन्यपूर्ण व विचार करून गोलंदाजीत प्रत्येक चेंडू भिन्न पद्धतीने टाकून फलंदाजाला कायम अडचणीत व दबावामध्ये ठेऊन त्याची दांडी गुल केली आहे. याचे श्रेय हातावरील वैशिष्ट्यपूर्ण मस्तक रेषेंना जाते. या मस्तक रेषेमुळे त्यांनी क्रिकेट जगतात एक स्पिनर म्हणून एक वेगळी शैली विकसित केली. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात नावाजले गेले व अजरामर झाले.

हृदय रेषा शनी ग्रहावर थांबली तर…

हर एक व्यक्तीतील दोष जन्मजात असतात. त्यावर नियंत्रण मिळविणे महाकठीण काम असते. हे दोष मनुष्याच्या स्वभावात दिसून येतात. त्यामध्ये मुख्यतः क्रोध, स्वार्थी भाव, अति भावनाप्रधानता, विनाकारण अत्यंत काळजी, आळस, थंड प्रवृत्ती व अत्यंत कामुक अश्या विविध स्वाभाविक मानसिकता असलेल्या व्यक्ती आपल्या सभोताली असल्याचे आपणास दिसते. हृदय रेषा जर शनी ग्रहावर थांबलेली असेल व ती शनी बोटाकडे वळाली असेल तर व्यक्ती मधील कामुकता अधिक असते.

हृदय रेषेवरच शेवटी बुध ग्रहावर जी छोटी आडवी रेषा असते ती विवाह रेषा होय. या एक दोन किंवा तीन संख्येने हातावर सापडतात. हस्तसामुद्रिकदृष्ट्या विवाह रेषा जरी या रेषेला संबोधलेले असले तरी ही विवाह रेषा खर्‍या अर्थाने स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाची, आकर्षणाची रेषा होय. हृदय रेषेचा बुध ग्रहावर शेवट होताना हि रेषा जर तीन चार रेषेने विभाजित झाली असेल तर अश्या व्यक्तींना आपत्य प्राप्ती नक्की होते. यावरून हृदय रेषा व तिच्यात व तिच्याच वरच्या बाजूस असलेली व सम्मिलीत असल्याने तिचे गुणधर्म प्राप्त होतात. हृदय रेषा ज्या ग्रहावर थांबते त्या ग्रहाचे शुभ अशुभ कारकत्व ती घेत असते.

भाव भावनेसह हृदय रेषेचे आरोग्य

माणसाच्या दोन्ही हातावर हृदय रेषा पाहावयास मिळते. दोन्ही हातावरच्या हृदय रेषेचे कार्य एकत्रित अभ्यासावे लागते. डाव्या हातावरची हृदय रेषा ही त्या व्यक्तीच्या संचित भाग्याची असते, हृदय रेषेवरील दोष असेल तर त्या व्यक्तीला निश्चितच हृदयविकाराला सामोरे जावे लागते. हृदयातील म्हणजेच हृदय रेषेवरील दोष व त्याच्या स्वरूपानुसार रेषेचा बारकाईने अभ्यास केल्यावर व्यक्तीचे गंडांतर योग कधी, केव्हा व किती गंभीर असतील त्याचे अचूक निदान करता येते. हृदयाचा ताण वाढला किंवा रक्तदाब अधिक वाढल्यास हृदय बंद पडू शकते. शेन वॉर्न यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक तरुणींबरोबर संबंध आल्याचे जाहीर केले होते. हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न असल्याने मीडियाने त्याचे अवडंबर करू नये हे त्यांनी बजावले होते. शेन वॉर्न यांचा मृत्यू हृदयघाताने झाल्याचे जाहीर करण्यात आले. शेन वॉर्न यांच्या हातावरील हृदय रेषा वय वर्ष 50 नंतरच पसरट झाली आहे, हे त्यांच्या डाव्या हाताच्या फोटोवरून स्पष्ट होत आहे. जेव्हा हृदयात रेषा पसरट होते, रंगाने काळी किंवा गडद तपकिरी होते व तुटलेली, अथवा ती साखळी युक्त असते त्या वेळेस हृदय थांबण्याचा म्हणजेच हृदय आघात होण्याचा दाट संभव असतो.

शुक्र ग्रह उंचवटा अति फुगीर

शुक्र हा प्रेम व स्नेहाचे प्रतीक असलेल्या मानवाच्या विविध भाव भावनांचे प्रतिनिधित्व करतो. शुक्र ग्रह सामान्य उभार घेतलेला असेल तर सर्व सामान्य शुक्र ग्रहाचे कारकत्व पाहावयास मिळतात. परंतु शुक्र ग्रह अति फुगीर व चंद्र ग्रहापेक्षा मनगटाकडे जास्त प्रमाणात सरकलेला असेल तर शुक्र ग्रह अशुभ होतो. शुक्र ग्रह अशुभ झाल्याने रती क्रीडा सामान्य न राहता तिच्यात अनैसर्गिक मार्गांचा अवलंब होऊ शकतो. बाजारात मिळणार्‍या उत्तेजक औषधांचे सेवन झाल्यास त्याचे परिणाम रक्तदाब वाढतो व कमकूवत हृदय ताण सहन न झाल्याने बंद पडू शकते. हस्तसामुद्रिकशास्रात हृदयाचे आरोग्य अचूक ओळखता येते. धोका कुठल्या वय वर्षात आहे त्याचे तंतोतंत भाकीत करता येते. शेन वॉर्न यांना वयाच्या 52 व्या वर्षी हृदय आघात झाल्याने किंवा हृदयाचे कार्य थांबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कधी कधी मानवी चुकासुद्धा मृत्यूस कारणीभूत होतात. त्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी न घेतल्याने हृदय आघाताला सामोरे जावे लागते. हातावरील ग्रह रेषा चिन्ह यांच्या बारकाईने केलेल्या परीक्षणामुळे मनुष्यातील काही चांगले गुण व अवगुण यांची सविस्तर माहिती होते. या विविध गुणांमध्ये जलद निर्णय घेणारे, अत्यंत चालाख, हुशार, विद्वान, धार्मिक प्रवृत्ती हे सर्व गुण दोष व्यक्तीच्या हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे, हाताचा, बोटांचा व अंगठ्याच्या आकारावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हस्तसामुद्रिकद्वारे अचूक ओळखता येतात. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि हे दोष जन्मजात असतात. जन्मजात असलेल्या प्रवृत्तीवर किंवा स्वभाव दोषांवर विजय मिळवणे महाकठीण असते. परंतु त्या व्यक्तीला आपल्यातील दोष माहित झाल्यावर त्या दोषावर नियंत्रण मिळविण्याचे काम तरुणपणात जरी झाले नाही तरी चाळीशीनंतर त्यांना त्यांच्यामधील दोषामुळे त्यांच्या आयुष्यात किती नुकसान झाले, याची त्याला जाणीव होते.

शेन वॉर्न यांच्याबाबत त्यांचा आयुष्याचा शेवट होण्याची घटना मनाला चटका लावणारी आहे. कारण त्यांच्या हृदयाचे आरोग्य कसे आहे याची त्यांना कल्पना असणारच. शेन वॉर्न यांचे या जगातून जाणे विधीलिखित जरी असले तरी कदाचित ती वेळ टळली असती तर त्यांचे जीवन पुढे चालू राहिले असते. शेन वॉर्न यांच्या जीवनातील निमंत्रित अपघातच म्हटला पाहिजे. शेन वॉर्न यांच्या डाव्या हातावरील हृदय रेषेत दोष असला तरी त्यांची दोन्ही हातावरची आयुष्य रेषा खणखणीत होती. म्हणूनच वॉर्न यांचा हा अपघात आहे, असे माझे निदान आहे. कारण हृदयाचे काम फक्त 30 टक्के असताना अनेक व्यक्ती वयाची नव्वदी पार करतात, अशीही उदाहरणे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या