Saturday, April 27, 2024
Homeनगरग्रामीण भागातून देखील उत्कृष्ठ खेळाडू घडतात - सौ. विखे

ग्रामीण भागातून देखील उत्कृष्ठ खेळाडू घडतात – सौ. विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

जीवनात मैदानी खेळाना अनन्य साधारण महत्व असून खेळामुळे शरीर निरोगी व सुदृढ बनत असते. स्वर्गिय खासदार साहेबानी आयुष्यभर सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रासाठी भरभरुन योगदान दिले. ग्रामिण भागातील मुलाच्या क्रिडागुणांना वाव मिळाल्यास ते देशपातळीवर नेतृत्व केल्याची उदाहरणे अजिक्यं रहाणे व झहीर खान याच्या रुपाने आपल्या पुढे असल्याचे गौरोउदगार माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी काढले आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे दिवगंत खासदार पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे मोरया क्रिकेट क्लबकडून आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सौ. विखे मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. रोहिणीताई किशोर निघुते, अशोकराव म्हसे, विनायकराव बालोटे, भगवानराव इलग, भाऊसाहेब जर्‍हाड, रामभाऊ भुसाळ, नानासाहेब डोईफोडे, अशोकराव जर्‍हाड, ज्ञानेश्वर वाकचौरे, हरिभाऊ ताजणे, नवनाथ ताजणे, मिलिदं बोरा, शांता ब्राम्हणे, शंकुतला गायकवाड, सुरेखा गायकवाड, गौरव सांबरे, गंगाराम गायकवाड, अनिल गायकवाड, वसंत गायकवाड, अशोक गायकवाड, सुनील गायकवाड, मंगेश गायकवाड, कुणाल शिंदे आदिसह सार्थक ब्राम्हणे, वरद ब्राम्हणे, संकेत ब्राम्हणे, महेश इघे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान 30 डिसेंबर रोजी पद्मभुषण दिवगंत खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनी भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी कुणाल ब्राम्हणे, विक्रांत वर्पे, कार्तिक गायकवाड, प्रमोद ताजणे, रोहित ताजणे, अमोल ताजणे, सोमनाथ गायकवाड, संकेत गायकवाड, जयकुमार गायकवाड, सुजित मंडलिक आदिसह खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केले. तर आभार विजय व अरुण ब्राम्हणे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या