Saturday, April 27, 2024
Homeनगरशाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी 16 कोटींचे अनुदान

शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी 16 कोटींचे अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (Scholarship scheme) व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत 16 कोटी रुपयांचे अनुदान (Grant) वितरीत करण्यास कृषी खात्याने (Agriculture Department Approved) मान्यता दिली आहे.

- Advertisement -

याचा लाभ राहुरीतील म. फुले कृषी विद्यापिठासह राज्यातील चारही विद्यापिठांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. सन 2019-20 मधील जागेवरील प्रवेश फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी 16 कोटी रुपये अनुदान (Grant) वितरीत करण्यास शासन मंजुरी देणयात आली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा (Consolation to the students) मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या