Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बसवंत येथील शाहिरावर भाजीपाला विक्रीची वेळ

पिंपळगाव बसवंत येथील शाहिरावर भाजीपाला विक्रीची वेळ

पिंपळगाव बसवंत। Pimpalgaon

लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या खणखणीत आवाजातील पोवाड्यांनी अवघ्या पिंपळगाव परिसराचे लक्ष वेधून घेणारे व अवघे तिसरी पर्यंत शिक्षण झालेले लोकशाहिर मधूकर जाधव यांना आता कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड झाले आहे.

- Advertisement -

मात्र त्याही परिस्थितीत जगण्याची उमेद उराशी बाळगून त्यांनी आता कुटुंबासह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

लोकशाहिर आण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबर्‍या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण… त्यांनी असे अनेक प्रकार समृद्ध केले.

तसेच फक्त तिसरी शिकलेले हे लोकशाहिर मधूकर जाधव हे वयाच्या दहाव्या वर्षी या बालकलाकाराचे तमाशा या लोककलेत आगमन झाले. आण्णाभाऊ साठेंप्रमाणे फडाचे सामने रंगू लागले. पण 1972 साली पडलेल्या दुष्काळाने पोटाची खळगीही भरेनाशी झाली तेव्हा आईवडिलांना गाव सोडावे लागले. ते आई वडिलांबरोबर पिंपळगाव बसवंतला आले व येथेच स्थायिक झाले. त्यावेळी पिंपळगावची लोकसंख्या ही फारशी नव्हती.

या मजूर लोकांनी सद्याच्या भाऊनगरमध्ये सुरुवातीला दहा-वीस झोपड्या बसविल्या व मोलमजूरी करू लागले. नंतर त्यांनी तमाशा सोडून दिला आणि नाफेडच्या चाळ्यांमध्ये कांद्याची हमालीची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. हा लोकशाहिर एकदा खूप आजारी पडला. लोकांनी त्यांना लोकशाहिर व एक कलावंत म्हणून आर्थिक मदत गोळा करुन त्यांचे प्राण कसेतरी वाचविले.

यानंतर त्यांनी खंडोबाचा जागरण गोंधळ करण्यास सुरुवात केली इतकेच नाही तर ते स्वतः अनेक कविता, गाणी, पोवाडे रचतात व त्यांच्या खड्या आवाजात आजही समाजप्रबोधन करतात. त्यांना दोन मुलं असून मोठा मुलगा केदू हाही मोलमजूरी करतो तर लहान मुलगा संदिप जाधव हा सुद्धा अतिशय चांगला कलाकार होता.

तो मुंबईला एका कार्यक्रमानिमित्त जागरण गोंधळ करण्यास गेला होता. त्यावेळी रेल्वे अपघातात त्याचे दुदैवी निधन झाले. मात्र म्हणतात ना कला माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आजही त्यांचा तोच आवाज आहे. मात्र आता वय झाले. उदरनिर्वाहासाठी जिवाचे रान करावे लागत आहे. आता ते पत्नीसमवेत भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले आहे. या व्यवसायासाठी त्यांना पत्नीचे गळ्यातील डोरले मोडावे लागले.

आण्णाभाऊ साठे यांची लोककला जिवंत रहावी ही त्यांची मनापासूनची चळवळ. आत्तापर्यंत त्यांनी अनेक कविता, पोवाडे केले. व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, आदिवासी गीते, भीम गीते, आण्णाभाऊ साठेंची गाणी, अनेक शूरवीरांची गीते, वग, गवळण असे कितीतरी काव्यप्रकार व गीते लिहिली व सुमधूर आवाजात चाली लावून गायली.

कोणत्याही प्रकारची पदवी न घेता केवळ तिसरी शिकलेल्या या समाजप्रबोधनकारास मी शेतकरी कन्या सलाम करते. लोककला जागृत राहणे ही आज काळाची गरज आहे असे आपल्याला वाटते पण लोककला जिवंत ठेवणार्‍याचे काय? आज तो कसा जीवन जगत आहे याविषयीही विचार करणे गरजेचे आहे.

पिंपळगावचा हा शाहिर, कवी, हरहुन्नरी कलाकार आजही उपेक्षितच रहावा ही खरे तर दुदैवाची बाब म्हणावी लागेल. शासनाने अशा कलाकारांना मानधन सुरू करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या