Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यायासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतर शाहिद आफ्रिदीच्या पोटात दुखलं; भारतीय क्रिकेटपटूनेही दिलं सडेतोड...

यासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतर शाहिद आफ्रिदीच्या पोटात दुखलं; भारतीय क्रिकेटपटूनेही दिलं सडेतोड उत्तर

दिल्ली । Delhi

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणावर काही वेळातच शिक्षेची सुनावणी होणार आहे. एनआयए कोर्टाने यासीनला यापूर्वीच दोषी ठरवले आहे. मात्र आता या निर्णयामुळे पाकिस्तानचे पित्त खवळलं असून त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) याबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

शाहिद आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘भारतात सुरू असलेल्या मानवी अधिकारांचे दमन विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यासिन मलिकविरूद्ध खोटे आरोप लावून काश्मीरचा स्वातंत्र्याबद्दलचा संघर्ष थांबणार नाही. मी विनंती करतो की युएनने काश्मिरी नेत्यांविरूद्ध सुरू असलेल्या खोट्या अन्यायकारक कायदेशील खटल्यांची दखल घ्यावी.’

दरम्यान आफ्रिदीच्या ट्वीटवर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने रिप्लाय देत त्याची बोलती बंद केली. ‘प्रिय शाहिद आफ्रिदी, यासिन मलिकने कोर्टात गुन्हा कबूल केला आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या जन्मतारखेसारखी दिशाभूल करणारी (फसवी) असू शकत नाही’, असे उत्तर अमित मिश्राने दिले.

यासीन मलिकने ‘आझादी’च्या नावाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी जगभरात नेटवर्क तयार केले होते. याप्रकरणी एनआयएने स्वत:हून दखल घेत ३० मे २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी १८ जानेवारी २०१८ रोजी डझनहून अधिक जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या पाठिंब्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) न्यायालयात सांगितले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या