Video : शाहीन आफ्रिदीच्या ‘त्या’ कृतीने जिंकली भारतीयांची मने; जसप्रीत बुमराहला दिले खास गिफ्ट

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

सध्या आशिया चषकामध्ये (Asia Cup) भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यात कोलंबोमध्ये (Colombo) महामुकाबला सुरु आहे. काल रविवार (दि.१० सप्टेंबर) रोजी पावसामुळे (Rain) सामना थांबवावा लागला होता. त्यानंतर राखीव दिवशी म्हणजेच आज सोमवार (दि.११ सप्टेंबर) रोजी उर्वरित खेळ (Ind vs Pak) होत आहे. क्रिकेटच्या मैदनात जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात तेव्हा मैदानावर जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते.

Maharashtra News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने साताऱ्यात तणाव; दोन गट भिडले, इंटरनेट सेवा बंद

यापूर्वी खेळा व्यतिरिक्त भारत-पाकिस्तानच्या सामन्यामध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळायचे. मात्र, अलीकडच्या काळात क्रिकेटच्या मैदानावर (Cricket Ground) असे फार क्वचितच घडताना दिसते. बऱ्याचदा दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना मित्रांसारखे वागवताना दिसून येतात. मात्र, अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) रविवारी (दि. १०सप्टेंबर) रोजी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Maratha Reservation : “त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन…”; मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन

काल म्हणजेच रविवार (दि.१० सप्टेंबर) रोजी पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) हातात भेटवस्तू घेत भारतीय संघाची ड्रेसिंग रुम गाठली. यावेळी शाहीन आफ्रिदीने भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) भेट घेतली आणि त्याला बाप झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच ज्युनिअर बुमराहसाठी एक गिफ्ट देखील दिले.

यावेळी शुभेच्छा देतांना शाहीन आफ्रिदी म्हणाला की, “भाई जी, बहुत-बहुत मुबारक हो। नए शहजादे के लिए यह छोटा सा तोहफा है। अल्लाह उसे हमेशा खुश रखे और वह नया बुमराह बने।”. असे आफ्रिदी बुमराहला म्हणाल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहने देखील शाहीन आफ्रिदीचे गिफ्ट स्विकारले आणि त्याचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. तसेच दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Cabinet Expansion : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार?; भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट, कुणाला मिळणार संधी?

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकामधील २ सप्टेंबर रोजीचा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह मायदेशात परतला होता. त्यानंतर जसप्रीत बुमराहाची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिने ४ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला.जसप्रीत बुमराहने स्वत: ट्वीट करून बाळासंदर्भात माहिती दिली होती. तसेच बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला होता. “आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खुश आहे”, असे त्याने पोस्टमध्ये लिहीले होते. बुमराह आणि संजना यांनी आपल्या बाळाचे नाव ‘अंगद’ असे ठेवले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Trimbakeshwer News : अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी गजबजली

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *