Monday, April 29, 2024
Homeनगरशहर टाकळी येथे हॉटेलमधून 2 लाखांची दारू जप्त

शहर टाकळी येथे हॉटेलमधून 2 लाखांची दारू जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील हॉटेल साईसिद्धी येथे छापा टाकला.

- Advertisement -

या छाप्यात अवैधरित्या साठवलेली 2 लाख 9 हजार 822 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केले. याप्रकरणी हॉटेल चालक योगेश अंबादास गवळी याला अटक केली आहे. शहर टाकळी येथील हॉटेल साईसिद्धीमध्ये अवैध मद्यविक्री केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत देशी दारू, विदेशी दारू तसेच बीअरच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, नगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कच्या पथकातील निरीक्षक दिगंबर शेळके, दुय्यम निरीक्षक संजय बोठे, शहाजी गायकवाड, सहायक दुय्यम निरीक्षक आर. एम. पारधे, व्ही. एन. रानमळकर, वैभव बारवकर, प्रताप कदम, सचिन बटुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या