Thursday, April 25, 2024
Homeनगरआणखी 27 तोळे बनावट दागिन्यांवर पावणेनऊ लाखांचे कर्ज

आणखी 27 तोळे बनावट दागिन्यांवर पावणेनऊ लाखांचे कर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणाच्या तपासात आणखी 27 तोळे बनावट दागिने आढळून आले आहेत. त्यावर 8 लाख 75 हजारांचे कर्ज घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे आरोपींची संख्या 39 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहर बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज घोटाळा चर्चेत आहे. तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. सोमवारी पुन्हा शहर बँकेतील दोन कर्ज खात्याच्या तपासणीमध्ये सुमारे 270 ग्रॅम म्हणजे 27 तोळे बनावट सोने आढळले आहे. यावर आठ लाख 75 हजारांचे कर्ज घेण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे.

दरम्यान, शनिवारीही 17 तोळे बनावट सोने आढळले होते. त्यामुळे आत्तापर्यंत सुमारे 37 खात्यांमध्ये आठ हजार 981 ग्रॅम म्हणणे जवळपास नऊ किलो बनावट दागिने ठेवल्याचे व त्याद्वारे शहर बँकेची सुमारे 3.25 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या