Saturday, April 27, 2024
Homeनगरदीड महिन्याअगोदर काय शिजल ?

दीड महिन्याअगोदर काय शिजल ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या बनावट सोनेतारण प्रकरणाचा गुन्हा दाखल होण्याच्या दीड महिना अगोदर हे प्रकरण समोर आले होते. दरम्यान त्यावेळी गुन्हा का दाखल झाला नाही, गुन्हा दाखल न होण्यामागे कोतवाली पोलीस ठाण्यातील कोणाचा समावेश आहे का? आदी बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकडे यांना दिले आहेत.

- Advertisement -

अहमदनगर शहर सहकारी बँकेत बनावट सोने आढळून आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. घोटाळ्यातील आरोपींची संख्या 39 झाली आहे. गुन्हा दाखल आहे आणि तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी गुन्हा दाखल होण्याच्या आधी दीड महिन्यापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात काही घटना घडल्याची चर्चा आहे.

आता गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. यानंतर प्रभारी अधिकार्‍यांनी कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा (डिबी) बरखास्त केली. दरम्यान यापूर्वीच गुन्हा का दाखल झाला नाही. गुन्हे दाखल न होण्यामागे कोण पोलीस आहेत. काही तडजोडी झाल्या आहेत का? याची चौकशी उपअधीक्षक कातकडे करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या