Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकाय झाडी, काय डोंगार फेम शहाजी बापू आदित्य ठाकरेंवर बरसले; आम्ही गद्दार...

काय झाडी, काय डोंगार फेम शहाजी बापू आदित्य ठाकरेंवर बरसले; आम्ही गद्दार आहोत, मग…

मुंबई | Mumbai

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राज्यभर दौरा करत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. या संवादात आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) सडकून टीका करताना दिसून येत आहेत…

- Advertisement -

आज आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे. जे गद्दार आमचे झाले नाही, ते तुमचे तरी होणार का?, तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना केला, तसेच त्यांनी बंडखोरांवर कडाडून टीका केली.

राज्यात पुन्हा मुसळधार; ऑगस्ट-सप्टेंबरचा अंदाज हवामान विभागाकडून सादर

यानंतर शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सवाल विचारला आहे. आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहे, तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ

आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत, आम्हाला अपमानित करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार दुखावले जात आहेत. आम्हाला थेट गद्दार म्हणणे योग्य नाही.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले…

उलट आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. लोकांच्या मनातील भावनेचा आदर करत आम्ही भाजपसोबत जात आहोत. त्यामुळे आम्ही काही चुकीचे करत आहोत, असे वाटत नाही, जनता आमच्या बाजूने आहे, असे शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले.

एका चुकीमुळे अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार; अमेरिकेने ‘असे’ राबवले ऑपरेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या