Thursday, April 25, 2024
Homeनगरशहाजापुरच्या माऊली कृपा गोशाळेवर बिबट्याची दहशत

शहाजापुरच्या माऊली कृपा गोशाळेवर बिबट्याची दहशत

सुपा |वार्ताहर| Supa

शहाजापुर (Shahajapur) येथील कवड्या डोंगरावरील माऊली कृपा गोशाळेत गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने (Leopard) चांगलीच दहशत निर्माण केली असून त्याच्यापासून मनुष्यसह गोवंशाना धोका (People and cattle Danger) निर्माण झाला आहे.

- Advertisement -

श्री क्षेत्र कौडेश्वर येथील माऊली कृपा गोशाळेवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा (leopard)वावर वाढला आहे. दर दोन दिवसांनी येथे बिबट्यांचा वावर आहे. शनिवारी सांयकाळी एक बिबट्या थेट गोशाळेच्या दारापर्यंत आल्याने जनावरांसह (Animals) कर्मचारीही घाबरुन गेले. त्याअगोदर दोन दिवसांपुर्वीही दोन बिबटे तेथे आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून गोशाळा परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. माऊली कृपा गोशाळेत लहान मोठी मिळून 500 च्या आसपास गोवंश आहेत.

यातील बहुतांशी गोंवश हे खाटीकखान्यांतून अथवा कसायाच्या तावडीतुन सोडून आणलेली आहेत. त्यामुळे ही जनावरे अशक्त असतात. यामुळे जनावरांवर आता बिबट्यासह इतर मांसाहारी स्वापदे यांची नजर आहे. याचा कारणामुळे या गोशाळेच्या परिसारात बिबट्याचा वावर असून यामुळे मनुष्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. या गोशाळेत व श्री क्षेत्र कौडेश्वराला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे भाविकातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून (forest department immediately cage Demand) बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गोशाळेचे संचालक हभप नितीन महाराज शिंदे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या