Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारशहादा पालिकेचा 98 कोटींचा अर्थसंकल्प

शहादा पालिकेचा 98 कोटींचा अर्थसंकल्प

शहादा । ता.प्र. Shahada

येथील (Municipality) पालिकेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 98 कोटी 38 लक्ष 25 हजार 545 रूपये तरतूदीचा व 1 कोटी 59 लक्ष 55 हजार 754 रुपये शिलकीचा तसेच कुठलीही करवाढ नसलेला (Budget) अर्थसंकल्पास प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे (Prantadhikari Dr. Chetansingh Girase) यांनी मंजुरी दिली आहे. (Collector) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तो पाठविण्यात आला आहे.

- Advertisement -

येथील नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ डिसेंबर 2021 ला पूर्ण झाल्यानंतर त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणूक कधी होणार याबाबत कुठलाही स्पष्ट निर्णय घेतला नसल्याने पालिकेवर प्रशासक म्हणून येथील प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांची नियुक्ती शासनातर्फे करण्यात आली आहे.

दरवर्षी पालिकेचा फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प तयार करण्यात येऊन मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. (Collector’s Office) जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर एप्रिल महिन्यापासून अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पालिकेचे वर्षभरातील आर्थिक कामकाज चालते.

(municipality) पालिकेवर प्रशासक असल्याने या कार्यकाळात अर्थसंकल्प कशा पद्धतीने तयार केला जातो याकडे संपूर्ण शहरासह राजकीय पक्षातील नेत्यांचे लक्ष लागून होते. गेल्या महिनाभरापासून विविध विभागप्रमुखांकडून माहिती मागविल्यानंतर पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यात कुठलीही करवाढ करण्यात आलेली नसली तरी मोठ्या योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात नाही. अर्थसंकल्प मंजुरीसाठी प्रशासक डॉ.गिरासे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे (Dinesh Sinare) व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

आगामी आर्थिक वर्षात पालिकेची आरंभीचे शिल्लक रकमेसह नगरपालिका निधी व इतर निधी त्याचप्रमाणे महसुली व भांडवली जमा रकमेतून पालिकेला विविध मार्गातून 98 कोटी 38 लक्ष 25 हजार 545 रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. या उत्पन्नातून महसुली खर्च व भांडवली खर्च हा पूर्ण आर्थिक वर्षात 96 कोटी 78 लाख 69 हजार 891 रुपये होणार असून यातून 1 कोटी 59 लक्ष 55 हजार 654 रुपये शिल्लक राहतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प मंजुरीच्या वेळेस सहाय्यक लेखापाल पारस गुजर, बांधकाम अभियंता आशिष महाजन, नगररचना अभियंता स्वप्निल वाडिले, करनिरीक्षक राजेंद्र सैदाने, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, कार्यालय पर्यवेक्षक सचिन महाडिक, सहाय्यक नगररचनाकार सुफियान, सभा लिपाक अल्ताफ मन्सुरी, चेतन गांगुर्डे, प्रभाकर सोनार, प्रल्हाद पाटील, किशोर पाटील, अजिक्य डोडवे, रतिलाल सोनवणे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या