Friday, April 26, 2024
Homeनगरगटारीच्या मागणीसाठी गटारीत बसुन केले अनोखे आंदोलन

गटारीच्या मागणीसाठी गटारीत बसुन केले अनोखे आंदोलन

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील प्रभाग दोन मधील दलीतवस्ती योजनेतील बंदिस्त गटार योजनेचा (Closed Sewer Scheme) निधी गटारीचे काम (Sewer Work) अपुर्ण सोडुन गटारीचे साहित्य अन्य ठिकाणी वापरण्यात आले. अर्धवट राहिलेली बंदिस्त गटार पुर्ण करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाचे उपाध्यक्ष तालुका नारायण काळे यांनी थेट गटारीत बसुन सुमारे दोन तास आंदोलन (Movement) केले. यावेळी या परिसरातील नागरीकांनी प्रभागातील सदस्यांविरोधात संताप व्यक्त केला. ढोल ताशाच्या गजरात आंदोलन (Movement) सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीक येथे जमा झाले होते.

- Advertisement -

येथील प्रभाग क्रमांक दोन मधील वाडगाव रस्त्याच्या (Wadgav Road) बाजुने दलीतवस्ती अंतर्गत बंदिस्त गटारीसाठी सुमारे 7 लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला होता. श्री. कचे यांच्या घरापासुन या गटार योजनेचे कामही सुरु झाले होते. निम्या भागापर्यंत गेल्यानंतर हे काम बंद करुन येथील साहित्य उचलुन अन्य ठिकाणी वापर करत या गटारीचे काम अर्ध्यावर सोडुन देण्यात आले. पुर्ण झालेल्या गटारीचे पाणी गटार अपुर्ण राहीलेल्या भागात पांगल्याने तेथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न (The Question of the Health of the Citizens) निर्माण झाल्याने भाजपाचे नारायण काळे यांनी उर्वरीत काम पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या मागणीला ग्रामपंचायत प्रशासनाकडुन प्रतिसाद मिळत नसल्याने काळे यांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला गटारीत बसुन आंदोलन (Movement) करण्याचे निवेदन दिले होते. त्यानुसार काळे यांनी काल सोमवारी सकाळी 10 वाजता ढोल ताशाच्या गजरात गटारीत बसुन सुमारे दोन तास आंदोलन (Movement) केले.

ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आंदोलनस्थळी भेट देवुन काळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी परिसरातील नागरीकांनी प्रभागातील सदस्यांच्या कार्यपध्दतीवर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर उपसरपंच खंडागळे यांनी येत्या दहा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने काळे यांनी आंदोलन स्थगित केले. मात्र दहा दिवसात प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही तर ग्रामपंचायत कार्यालयावर या परीसरातील नागरीक मोर्चा काढतील, असा इशारा यावेळी नागरीकांनी दिला.

यावेळी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी माजी सभापती नानासाहेब पवार, रमेश धुमाळ, राजेंद्र कोकणे, युवा नेते भाऊसाहेब पवार, मुकुंद हापसे, बापुसाहेब शिंदे, विलास दाभाडे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, भाऊसाहेब पटारे, विकास मगर, अशोक कचे, सुभाष ब्राम्हणे, चंद्रकांत थोरात, श्री. गोतिस, संभाजी ब्राम्हणे, राजेंद्र रणनवरे, सुरेश बनकर, नानासाहेब ब्राम्हणे, ज्ञानेश्वर पवार आदींसह प्रभागातील नागरीक व महीला उपस्थित होत्या. यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य सुनिल बोडखे व ग्रामविकास अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाही. त्यामुळे या परीसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या