Thursday, April 25, 2024
Homeनगरसांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 78 लाखांचा प्रस्ताव

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 78 लाखांचा प्रस्ताव

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

अस्तगाव ग्रामपंचायतीच्या सांडपाणी, व घनकचरा व्यवस्थापनासाठी 78 लाख रुपयांचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार केला आहे, अशी माहिती सरपंच नवनाथ नळे यांनी दिली.

- Advertisement -

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने दोन वर्षानंतर आयोजित केलेल्या ग्रामसभेत सरपंच नळे बोलत होते. या ग्रामसभेत गटार योजना, सांंडपाणी, प्रधानमंत्री आवास योजना, गावात बाहेरच्यांना दिलेल्या अनधिकृत जागा, हायमॅक्स आदी विषयावर साधकबाधक चर्चा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नवनाथ नळे हे होते. गणेशचे संचालक विजयराव गोर्डे, केशवराव चोळके, भाजपाचे ओबिसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जेजुरकर, नंदकुमार गव्हाणे, संतोष गोर्डे, अशोकराव नळे, ज्ञानदेव चोळके, निवास त्रिभुवन, बाबुराव लोंढे, अ‍ॅड.पंकज लोंढे, दादा गवांदे, सदस्य सुरेश जेजुरकर, सुमित्र त्रिभुवन, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गोर्डे, मुख्याध्यापक झरेकर, रामदास काळोखे, भारत गोर्डे, विजय जेजुरकर, अनिल पठारे, प्रशांत गोर्डे, रविंद्र जेजुरकर, अविनाश जेजुरकर, बशीर शेख, गणपत पठारे, काशिनाथ जेजुरकर, तलाठी पदमा वाडेकर, अशोक सखाराम नळे, सुनिल चोळके, राहुल चोळके, सुनिल त्रिभान, साहेबराव लोंढे, अशोक पेटारे, विलास तरकसे यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन व काही योजनांचे वाचन, लाभार्थ्यांचे वाचन ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर यांनी केले. यावेळी काँग्रेसचे दादा गवांदे यांनी गटार केली, त्यात पाणी साचते अशी तक्रार केली. तर नाना जेजुरकर यांनी गावाचे गटार आमच्या वस्त्यांकडे सोडू नका, आमचे पिण्याचे पाणी खराब होईल. आम्हाला पिण्यासाठी पाणी कोण देईल? असा सवाल केला. त्यावर सरपंच नवनाथ नळे म्हणाले, 15 व्या वित्त आयोगामधुन 78 लाखांचा प्रस्ताव तयार केला. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन चांगले पाणी खाली सोडू, कुणाचेही पाणी खराब होणार नाही. पाणी ओढ्यात सोडण्यात येणार आहे. या विषयावर अ‍ॅड. पंकज लोंढे, सतीश आत्रे, गणेश चोळके, संदिप जेजुरकर यांनी सहभाग घेतला. गटाराच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना हे गटार मागील सदस्यांमध्ये कुणी केली? असा सवाल करताच सभेत शांतता पसरली.

यावेळी इतर ही विषयावर चर्चा झाली. त्यात सरपंच नळे व ग्रामसेवक मगर यांनी उत्तरे दिली. काहीवेळा नंदकुमार गव्हाणे, अशोकराव नळे यांनाही हस्तक्षेप करत ग्रामपंचायतीची बाजु मांडली. मुख्याध्यापक रामदास काळोखे यांनी नविन मतदार नोंदणी बाबत सभेत माहिती देवून बीएलओची माहिती दिली. शिरीष त्रिभुवन यांनी दलित वस्ती योजनेतील निधीचा विनियोग कसा झाला. आपला रस्ता पाण्यातुन आहे. तेथे निधी देण्याची मागणी केली. भिका त्रिभुवन, अशोक पेटारे यांनी ही सातमोर्‍याकडे जाणारे पाण्याबाबत सभेत आवाज उठविला. यावेळी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी बाबुराव लोंढे यांची तर उपाध्यक्षपदी रविंद्र नामदेव जेजुरकर, सतीश आत्रे, संजय अंभोरे, सुरेश मोरे यांची निवड करण्यात आली. या सभेत बिअर बारच्या मंजुरीसाठी ठराव मंजुर करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र गोर्डे यांनी कोव्हिड काळात चांगले काम केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.

यावेळी रामकृष्ण तरकसे, नाना अष्टेकर, सुरेश मोरे, सुरेश त्रिभुवन, अरिफ तांबोळी, पांडूरंग गोर्डे, भानुदास गवांदे, विजय अंभोरे, राजेंद्र तांबे, संजय चोळके, राजेंद्र पठारे, दिलीप नळे, सनी चोळके, पवन नळे, प्रविण घोडेकर, बबन नळे, ग्रामपंचायत सदस्या दिपश्री चोळके, त्रिभुवन, राहुल पोकळे, सचिन जेजुरकर, भिमा नळे, विकास नळे, वैशाली चौळके, शुभम गायकवाड अदि उपस्थित होते.

विखे यांच्या अभिनंदनाचा ठराव!

आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावासाठी 40 लाख रुपयांचा मुरुम दिला. सर्व गावाने त्याचा लाभ घेतला त्यांचे अभिनंदनाचा ठराव गणेशचे संचालक विजय गोर्डे यांनी मांडला. त्यास नंदकुमार गव्हाणे यांनी अनुमोदन दिले. तर नंदकुमार गव्हाणे यांनी वयोश्री योजना यशस्वी पणे राबवित असल्याबाबत खा. डॉ. विखे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या