Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमोहबारीत तीव्र पाणी टंचाई

मोहबारीत तीव्र पाणी टंचाई

मोहबारी । वार्ताहर

कळवण तालुक्यातील मोहबारी येथे गेल्या तीन ते चार वर्षापासून पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गावातील महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. येथे आदिवासी महिलांना पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरींवर भटकंती करावी लागत आहे. आता सध्या पिण्यासाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्या देशात करोना विषाणुने थैमान घातले आहे. गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे करोना विषाणुचा कहर त्यातच मार्च महिना सुरु होताच उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढत असल्याने मोहबारी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. वाड्या- वस्त्यांना पाणी टंचाईमुळे आता खर्‍या अर्थाने उन्हाळ्याची जाणीव होत आहे. हातपंप, विहिरी, नाले, छाटेे मोठे बधांरे कोरडेठाक पडले आहेत. तर मात्र आता सध्या मोहबारी येथे. स्वखर्चाने लोकांनी वर्गणी जमा करून गावांमध्ये एका दिवसाला एक टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

परंतु सर्वच गावाला तहान टॅकरद्वारे भागवली जाते असे नाही. तीन ते चार वर्षापासून गावातील महिलांचे प्रचंड हाल होत आहे. तीव्र पाणी टंचाई दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोहबारी येथील गावाला कायमचे शुद्ध पाणी व खात्रीशीर पेयजलाचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. एक हंडा पाण्यासाठी येथील महिला, मुलांना व पुरुषांना रोजच झगडावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी रात्री बेरात्री धावपळ करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांमध्ये वादविवादाचे प्रसंग उद्धभवतात.

येथील नागरिकांना एक हंडाभर पाण्यासाठी जीव भांड्यात टाकावा लागत आहे. माणसाची ही अवस्था तर मुक्याजनावराची स्थिती या अपेक्षाही खुपच गंभीर बनली आहे. त्यामुळे येथील स्थानिक वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने संकटात सापडले असल्याचे दृश्य समोर असल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईचे प्रश्न अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे समस्या मांडली असताना विहिर करतो ,पाइपलाइन करतो, अशी आश्वासने दिली आहेत.

मात्र पाणी आलेच नाही. त्याच बरोबर पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून नवीन योजना प्रस्तावित केली आहे. त्यास मंजुरी मिळाली नाही असे सांगण्यात आले. सध्या तात्पुरत्या स्वरुपात विंधन विहिरी घेऊन, अथवा शेतकर्‍यांची विहिरी अधिग्रहीत करुन गावाला पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन ग्रामसेवक आर. एस. जाधव यानी दिले.पाणी नसल्याने शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी महिलांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या