Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव – Jalgaon :

शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याचे आदेश मंगळवारी निर्गमित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

मनपातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, विद्यमान महापौर जयश्री महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेवून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सहकार्याने मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.

- Advertisement -

उदय पाटील, अध्यक्ष, मनपा कर्मचारी समन्वय समिती

महापालिकेतील अधिकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे आमदार राजूमामा भोळे, आजी-माजी महापौरांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार मनपातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत नगरविकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मनपा कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समन्वय समितीचा पाठपुरावा

सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचारी समन्वय समिती गठीत करण्यात आली होती. यात उदय पाटील, अरविंद भोसले, सुशिल साळुंखे, एस.एस.पाटील, राजेंद्र पाटील, विलास सोनवणी, बाळासाहेब चव्हाण, सुनील गोराणे, दिनानाथ भामरे, संजय अत्तरदे, नरेंद्र चौधरी, शरद बडगुजर, चंद्रकांत वांद्रे, अनिल पाटील, वसंत सपकाळे, लक्ष्मण सपकाळे, डॉ.विकास पाटील, सुहास चौधरी, चंद्रकांत सोनगिरे, गोपाळ लुल्हे, अविनाश बाविस्कर, रवी कदम, दीपक फुलमोगरे यांचा समावेश आहे. समितीतर्फे आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, विद्यमान महापौर जयश्री महाजन यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

पाच टप्प्यात मिळणार फरक

शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन १ जानेवारी २०२१ पासून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेने आर्थिकस्थिती विचारात घेवून २०१६ ते २०२० या कालावधीतील थकीत फरक पाच टप्प्यात देण्याची दक्षता घेण्याबाबतचे आदेशात नमुद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या