Friday, April 26, 2024
Homeजळगावबालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षा

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षा

अमळनेर : Amalner

बोरे खाण्याचे आमिष देऊन सहा वर्षाच्या बालिकेवर ( girl) अतिप्रसंग (extreme case)करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोपडा तालुक्यातील आडगाव (Adgaon) येथील बाबूलाल बारकू भिल (Babulal Barku Bhil) याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने (Amalner District Sessions Court) सात वर्षांची (Sentenced to seven years)शिक्षा सुनावली आहे.  

- Advertisement -

१० जानेवारी २०२२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका सहा वर्षाची बालिकेला तिचे आई वडील तिला आजीजवळ सोडून शेतात मजुरीसाठी गेले असताना गावातील बाबूलाल बारकू भिल वय २८ याने  पीडित सहा वर्षाच्या बालिकेला  बोरे खाण्याचे आमिष दाखवून नाल्यात घेऊन गेला. तिचे हात बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न  करीत असताना तेथून भावलाल कोळी घराकडे जाताना त्याची नजर या गैरप्रकारकडे गेली. हे पाहताच बाबूलाल तेथून पळून गेला. भाऊलाल याने मुलीच्या आई वडिलांना झाला प्रकार सांगितल्याने आरोपी बाबूलाल विरुद्ध विनयभंग व पोकसो कायद्यांतर्गत ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१९ रोजी बाबूलाल यास अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. या खटल्याचे कामकाज अमळनेर येथील अतिरिक्त न्यायालयात सुरू  होता.   त्यानुसार सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात तपासी अधिकारी जी सी तांबे , पीडित बालिका ,तिची आई ,भावलाल कोळी यांची साक्ष ग्राह्य धरून न्या पी आर चौधरी यांनी आरोपीला  कलम ३५४ प्रमाणे सात वर्षांची शिक्षा व पोकसो कायदा कलम ८ प्रमाणे पाच वर्षांची शिक्षा सुनावली . दोन्हीही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या