Thursday, April 25, 2024
Homeनगरपुढील दीड महिने विद्यार्थी गिरवणार मागील इयत्तेचे धडे

पुढील दीड महिने विद्यार्थी गिरवणार मागील इयत्तेचे धडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदाचे शैक्षणिक वर्ष (Academic year) 2021-22 सुरू झाले आहे. मात्र, मागील वर्षीच्या ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ उपक्रमात सर्वच विद्यार्थ्याची इयत्तानिहाय आणि विषयनिहाय विषय संपादित होण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. यामुळे 1 जुलैपासून शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानूसार (Orders of the Department of School Education) दीड महिना मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजाळणी होवून त्यात ठराविक कालावधीत तीन चाचण्या होणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाची (Zilla Parishad Education Department) तयारी सुरू झाली आहे.

- Advertisement -

करोनामुळे (Corona Problem) मागील वर्षी शाळा बंद, पण शिक्षण सुरू उपक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले. तरीही शिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी (Curriculum Review) व्हावी, यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे. यात सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 जुलै ते 14 ऑगस्ट या 45 दिवसांच्या कालावधीत हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून मराठी आणि उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्रे विषयांसाठी हा उजळणी अभ्यासक्रम राहणार आहे.

सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आल्या असून, त्या विद्यार्थीकेंद्रीत, कृतीकेंद्रीत तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. विद्यार्थी याद्वारे स्वयंअध्ययन करू शकतील. तसेच सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर 3 चाचण्या देण्यात आल्या असून शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन (Online) अथवा ऑफलाईन (Offline) सोडवून घेऊन त्या तपासण्यात येणार आहेत. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (Education Department of Zilla Parishad) जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना याबाबत सविस्तर सुचना देवून 1 जुलैपासून उजाळणी अध्यापन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी अभ्यासक्रमाची पीडीएफ (PDF) तयार करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

दीड महिन्यांनंतर मागील इयत्तेची उजाळणी झाल्यानंतरच ज्यात्या इयत्तेचा विषयानिहाय अभ्यासक्रम सुरू होणार आहे. दरम्यानच्या काळात पाठ्यपुस्तेक उपलब्ध होणार असून यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होणार आहे. तर दुसरीकडे करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या इशार्‍यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेबाबत गोंधळाची स्थिती झाली असून ही परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या