Thursday, April 25, 2024
Homeनगरसेतुत दाखल्यासाठी घेतले जादा पैसे; संतप्त महिलेने कर्मचार्‍यास चपलेने मारले

सेतुत दाखल्यासाठी घेतले जादा पैसे; संतप्त महिलेने कर्मचार्‍यास चपलेने मारले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कोणत्या दाखल्यासाठी किती पैसे घ्यायचे असे दरपत्रक शासनाने ठरवून दिेलेले असतानाही श्रीरामपूरातील एका सेतु कार्यालयात जादा पैसे घेण्याचा प्रकार घडला. या सेतुत एका महिलेकडून 50 रुपये मुळ दर असताना जास्तीची 2 हजार रुपये मागितले असता संतप्त महिलेने या सेतुत काम करणार्‍यास चपलेले मारले. यावेळी सेतु चालकाने मात्र गुपचुप काढता पाय घेतला. सदरचे सेतु कार्यालय हे श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविकेच्या पतीचे आहे. याबाबतचा व्हिडीओ श्रीरामपूर शहरात एक चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोडवरील सेतु कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याचे सिध्द झाले आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सेतु कार्यालयात नागरिक विविध प्रकारचे दाखले काढण्यात जात असतात. त्या प्रत्येक दाखल्यासाठी प्रशासनाने दरही ठरवून दिलेले आहेत. ाखला किती दिवसात हे ठरलेले असताना ऐ ना ते कारण देवून दाखले दिले जात नाही. काही लोक जादा पैसे देवून दाखले तातडीने घेत असतात.

अशा पध्दतीने असे सेतू चालक एका दाखल्यासाठी लूट करत असतात. अशाच एका श्रीरामपुरातील सेतु कार्यालयात एका महिलेकडून एका आधारकार्डसाठी गेली असता त्यासाठी 50 रुपये फी असताना 2 हजार रुपये मागितले. असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन हजार रुपये कसे असे या संतप्त महिलेने विचारत त्या सेतू कर्मचार्‍यास चपलेने मार दिला. यावेळी सेतू चालक आतमध्येच निमुटपणे ऐकत होता. मात्र महिला अधिक संतप्त होत असल्याचे पाहून सेतू चालकाने सेतूतून काढता पाय घेतला. अनेकवेळा हेलपाटे मारुनही या सेतूतून दाखले न मिळाल्याने ही महिला संतप्त झाली होती. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ काढून तो सर्वत्र व्हायरल केल्याने या सेतूची शहरात जोरदार चर्चाच सुरू होती.

जादाचे पैसे परत मिळाले

सेतू कार्यालयात आधार कार्डसाठी माझ्याकडून एजंटने जास्तीची रक्कम मागितली होती. ती जादाची रक्कम सेतू चालक केतन खोरे यांनी काल मला मिळवून दिली असल्याची माहिती लेखी स्वरुपात दिली आहे.

तक्रार आल्यास कारवाई- तहसीलदार

सेतू कार्यालयात कोणत्या कागदपत्रासाठी किती पैसे घ्यायचे हे ठरवून दिलेले असतानाही कोणी जादा पैसे मागत असेल आणि तशी कोणी तक्रार दिली तरी त्या सेतू कायालय चालकाविरुध्द कडक कारवाई करू. नियमापेक्षा कोणी जादा पैसे मागत असेल तर पुराव्यासह तक्रार करा, सेतू कार्यालयाच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवून चालकाविरुध्द कडक कारवाई करू, असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या