उपमहापौरांच्या जनता दरबारात ४०० तक्रारींचा निपटारा

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – Jalgaon

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी उपमहापौर सुनिल खडके यांनी गेल्या महिनाभरापासून प्रत्येक गुरुवारी जनता दरबार हा उपक्रम सुरु केला होता.

या उपक्रमात गेल्या चार आठवड्यात ५८५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४०० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत १८७ तक्रारींंचा निपटारा करण्यासाठी पाठपुरवा सुरु असल्याची माहिती उपमहापौर सुनिल खडकेंनी दिली.

शहरात अमृत व मल्लनिस्सारण योजनेचे काम सुरु असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

तसेच मनपात वारंवार फेर्‍या मारुन देखील नागरिकांच्या तक्रारी सुटत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी सोडण्यासाठी उपमहापौर सुनिल खडके यांनी दर आठड्याच्या गुरुवारी मनपाच्या प्रांगणात जनता दरबार हा उपक्रम सुरु केला होता. आज मनपाच्या प्रांगणात शेवटचा जनता दरबार भरविण्यात आला. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, आयुक्त सतीश कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, प्रभाग समिती सभापती मनोज आहुजा, नगरसेवक कुलभूषण पाटील, पार्वता भिल, किशोर बाविस्कर, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख उपस्थित होते. आज जनता दरबारचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी तक्रारी करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी नागरिकांकडून बंद स्ट्रीट लाईटस, रस्त्यावरील मोठे व धोकेदायक खडडे बुजण्याकडे होणारे अक्षम्य दूर्लक्ष, गटारींवरील कल्वर्ट रस्त्याला अनुरुप बांधलेले नसल्याने वाहतुकीला येणार्‍या अडचणी, साफसफाईसाठी कर्मचारीच पोहोचत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *