Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘सेट’चा निकाल जाहीर, ४ हजार उमेदवार उत्तीर्ण

‘सेट’चा निकाल जाहीर, ४ हजार उमेदवार उत्तीर्ण

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४ हजार ११४ उमेदवार एसईटी अर्थात सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निकालाची घोषणा केली आहे. विद्यापीठाद्वारे जारी केलेल्या परिपत्रकानुसार, परीक्षेत एकूण ६१,११४ उमेदवार उपस्थित होते. यापैकी ४, ११४ उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ६. ७३ टक्के आहे.

विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी २७ डिसेंबर २०२० रोजी सेट परीक्षा घेण्यात आली होती.

पात्र उमेदवारांना ई-प्रमाणपत्र १९ एप्रिलपासून डाउनलोड करता येणार आहे. परीक्षेची उत्तर तालिका अंतिम असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार त्याबाबत कोणतीही तक्रार नोंदवता येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या