Wednesday, April 24, 2024
Homeनगरसेवा सोसायट्यांच्या सचिवांचे विविध मागण्यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

सेवा सोसायट्यांच्या सचिवांचे विविध मागण्यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमध्ये कार्यरत असलेल्या सचिवांच्या विविध

- Advertisement -

प्रश्नांच्या मागणीबाबत संगमनेर तालुक्यातील सेवा सोसायटी संघाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात महसूलमंत्री नामदार थोरात यांना हे निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, माजी तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, प्रकाश कडलग, मोहन पवार, अनिल दिघे, बाबासाहेब भवर, शांताराम सरोदे, विनायक भोकनळ, मुकुंद सातपुते आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या जिल्ह्यामध्ये 1150 संस्था कार्यरत असून या संस्थांचे कामकाज पाहण्यासाठी 590 सचिव कार्यरत आहेत. 201 संस्थांवर खाजगी सचिव काम करत आहेत. एका सचिवाकडे दोन ते चार संस्थांचे कामकाज असून त्यांना मिळणारा पगार हा फार तुटपुंजा आहे.

2016 मध्ये संचालक मंडळाने या सचिवांना दोन टक्के प्रमाणे अंशदान देण्याचे ठरविले होते. ते मिळाले नसून दिवाळीमध्ये 24 टक्के बोनस दिला आहे. परंतु करोना संकटामध्ये सचिवांनी जीव धोक्यात घालून शेतकर्‍यांना कर्ज वसुली व कर्ज वाटप केले पाहिजे.

त्यामुळे या दिवाळीत 24 टक्के बोनस व दोन टक्के अंशदाना व्यतिरिक्त अनुदान देण्यात यावे, करोना काळात काम करणार्‍या सर्व सचिवांना कोव्हिड -19 अंतर्गत विमा संरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना दिले असून याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे नामदार थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या