Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाबंद

नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाबंद

नैताळे । वार्ताहर Naitale / Niphad

नैताळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात Naitale Primary Health Center रुग्णांवर उपचार करणार्‍या सेवक वर्गापैकी वैद्यकिय अधिकार्‍यांसह 80टक्के सेवक करोना Corona विषाणूच्या संसर्गाने बाधित झाले आहेत. त्यामुळे या केंद्रातील आरोग्य सेवाच दोन दिवस बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ हेमंतकुमार मंडलिक यांनी दिली.

- Advertisement -

निफाड पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक खेड्यांचे प्रमुख केंद्र म्हणून पाहिले जाते येथे दररोज अनेक रुग्णांवर औषध उपचार केले जातात. मात्र सध्या सर्वत्रच कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते नैताळे परिसरातही कोरोना विषाणू संसर्गाचे अनेक रुग्ण आढळले आहेत .

मात्र लसीकरण जास्त झाल्याने विषाणूची तीव्रता कमी आहे. या आरोग्य केंद्रातील नव्यानेच बदली होऊन रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी डाँ.पूजा लहाने यांच्यासह आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या