Wednesday, April 24, 2024
Homeनगरनोकर पती- पत्नीने चोरले सव्वा तीन तोळ्याचे दागिने

नोकर पती- पत्नीने चोरले सव्वा तीन तोळ्याचे दागिने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यावसायिकाच्या (Professional) घरातून नोकर पती-पत्नीने सुमारे सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरल्याची (Gold Jewelery Theft) घटना बालिकाश्रम रस्त्यावरील बागडी मळा येथे घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिक मिहिर मिलिंद कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार नोकरदार रोशन सुजर दर्जी व त्याची पत्नी रोशनी दर्जी (दोघे रा. पश्चिम बंगाल) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

अंगावर डिझेल ओतुन पेटवून घेण्याचा प्रयत्न !

मिहिर कुलकर्णी हे बागडी मळा, बालिकाश्रम रस्ता येथे राहतात. ते एमआयडीसी (MIDC) येथे खासगी व्यवसाय करतात. 15 सप्टेंबर रोजी सकाळी ते एमआयडीसी (MIDC) येथे कामावर गेले असताना त्यांच्या आईने त्यांना घरातील दोन तोळ्याची सोन्याची चैन (Gold Chain) व सव्वा तोळे वजनाची सोन्याची अंगठी गायब असल्याचे सांगितले. तसेच घरातील नोकर व त्याची पत्नी घरात दिसत नसल्याचेही सांगितले. त्यावेळी घरातील लोकांनी नोकरांचा शोध घेतला.

हैदराबादला जाण्याआधी तिघींपैकी एका मुलीवर नगरमध्ये अत्याचार

ते रेल्वे स्थानकावर आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला आमच्या घरी पश्चिम बंगाल (West Bengal) येथे जायचे असल्याने व आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही तुमची सोन्याची चैन व अंगठी घेतली, असे कबूल केले. परंतु आम्ही रेल्वे स्टेशन (Railway Station) येथे येत असताना ते दागिने गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुलकर्णी यांनी त्या दोघांना तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) आणले व दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भाजपचा अंतर्गत वाद उफाळला

- Advertisment -

ताज्या बातम्या