Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशसीरम आणि भारत बायोटेक लसींचे उत्पादन वाढवणार

सीरम आणि भारत बायोटेक लसींचे उत्पादन वाढवणार

नवी दिल्ली –

भारतातील सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या करोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी लसींच्या उत्पादनाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला एक अहवाल दिला आहे.

- Advertisement -

या अहवालानुसार सीरम इन्स्टिट्युटने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा सुरुवातीपासून दरमहा 10 कोटी कोविशिल्ड लस उत्पादित करणार असल्याचे म्हटले आहे. तर भारत बायोटेक कंपनीही उत्पादन वाढवणार असून दरमहा 7.8 कोटी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन करणार आहे.

एका वृत्तानूसार, आरोग्य मंत्रालय आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या दोन्ही लस निर्मात्या कंपन्यांकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार्‍या उत्पादनाबाबतची माहिती मागितली होती. त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी लसींचे उत्पादन वाढवण्याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या