Thursday, April 25, 2024
Homeनाशिकभगुरला भाऊबंदकीच्या वादातुन एकावर गंभीर हल्ला

भगुरला भाऊबंदकीच्या वादातुन एकावर गंभीर हल्ला

देवळाली कँम्प | Deolali Camp

भगुर येथे सोमवारी (दि. ११) रात्री च्या सुमारास भाऊबंदकीच्या जुन्या वादातुन एकाने दुसऱ्या वर कोयत्याने हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फियादीँ भुषण मोहन राजगुरू (रा. सुभाष रोड, भगुर) याचे किराणा दुकान असुन काल सोमवारी (दि.११) नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी जात होता.

यावेळी त्यांचे चुलतभाऊ सचिन नंदकिशोर राजगुरू, जागृती सचिन राजगुरू, संगिता नंदकिशोर राजगुरू (सर्व राहणार सुभाष रोड, भगुर ता. जि. नाशिक) यांनी मागील भांडणाची कुरापत काढुन भुषण याच्या वर कोयता, चाकु सदृश्य हत्याराने वार केले. भुषण जोराजोरात ओरडत असताना त्याचे वडील मोहन राजगुरू धावुन आले. यावेळी त्यांच्यावर देखील हल्ला केला.

घटनेची माहिती देवळाली कँम्प पोलिस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी भुषणला सिव्हील हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या बाबत संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास व पो नी सुभाषचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या