Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशशेअर बाजार भयावह कोसळला; सेन्सेक्समध्ये २ हजार ७०० अंकांची घसरण

शेअर बाजार भयावह कोसळला; सेन्सेक्समध्ये २ हजार ७०० अंकांची घसरण

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतीय शेअर बाजार (stock market) रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Russia-Ukraine war)मोठ्या प्रमाणत घसरला आहे. सेन्सेक्स (Sensex) २,७०० अंकांनी किंवा ४ टक्क्यांहून अधिक घसरत ५५ हजार अंकांच्या खाली आला. तर निफ्टी (Nifty) ७५० अंकांच्या घसरणीसह १६,१०० अंकांच्या पातळीवर आला आहे….

- Advertisement -

यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वांत मोठी घसरण बँकिंग (Banking) आणि आयटी (IT) समभागांना कारणीभूत ठरली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर जवळपास सात टक्क्यांनी घसरला आहे.

आईसह बहिणींवर अत्याचार; मुलीच्या तक्रारीवरून भोंदूबाबास बेड्या

यानंतर एशियन पेंट, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल, बजाज फिनसर्व्ह, मारुती यांच्या समभागातही चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर बुधवारीही अमेरिकेच्या शेअर बाजारही मोठ्या घसरणीसह बंद झाले.

Russia-Ukraine Crisis : शस्त्र वापरता येणाऱ्यांनी लष्करात सहभागी व्हावे; युक्रेनचे आवाहन

त्याचा परिणाम गुरुवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजारात दिसून आला. सलग सहा सत्रांच्या घसरणीनंतर आज सातव्या सत्रातही सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. बीएसईचा ३० शेअर्सचा महत्त्वाचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी ९.१५ वाजता १८१३ अंकांनी घसरून ५५,४१८ वर उघडला. दुसरीकडे, निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.

Russia-Ukraine Crisis : रशियाकडून युद्धाची घाेषणा; अमेरिकेसह युरोपला पुतीन यांचा इशारा

- Advertisment -

ताज्या बातम्या