Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचीनच्या अर्थव्यवस्थेला ज्येष्ठांचा अडसर

चीनच्या अर्थव्यवस्थेला ज्येष्ठांचा अडसर

– अनिल विद्याधर

चीनची वाढती आर्थिक शक्ती ही अनेक संघर्षाला निमंत्रण देणारी आहे. एकीकडे अमेरिका आर्थिक मंदी आणि कोरोनाचा सामना करत आहे तर चीन आणि नेते आपल्या योजनेतून बेधडक कार्यक्रम आखत आहेत.

- Advertisement -

परंतु चीनमधील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या हे अर्थव्यवस्थेच्या विकासाला आव्हान ठरत आहे. संपूर्ण जगावर राज्य करण्यासाठी चीन आतूर झाला आहे. यासाठी चिनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात धडाकेबाज कार्यक्रम आखले जात आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे जगात नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल पीपल्स काँग्रेसने आपल्या वार्षिक बैठकीत नव्या योजनांवर भर दिला. तीन हजार सदस्यांच्या काँग्रेसची यंदाची बैठक ही वर्षातील सर्वात मोठी राजकीय बैठक मानली गेली. यात सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाची अतिउत्साही दुरदृष्टी दिसून आली. एका अर्थाने जागतिक शक्तीच्या रुपाने चीनची निर्मिती करणे आणि अशी शक्ती की जगाने त्यापुढे नतमस्तक व्हावे, असे ध्येय निश्चित केले गेले. याबरोबरच कम्युनिस्ट पक्षाने सत्तेत राहण्यासाठी ध्येय निश्चित केले. डिजिटल माध्यमांवर सेन्सॉरशिप, माध्यमांवर बंधने आणि सरकारवर किंवा पक्षांवर टीका करणार्‍यांना तुरुंगाची हवा या माध्यमातून कम्युनिस्ट पक्ष चीनवर पकड ठेवत आहे. 70 वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहिल्याचे सकारात्मक परिणाम नागरिकांसमोर आणलेे जात आहेत. कम्युनिस्ट पक्षाने यंदा समृद्ध समाजाच्या निर्मितीचेे ध्येय ठेवले आहे.

देशातील प्रति व्यक्तीचे उच्पन्न हे सध्या दहा हजार डॉलरच्या वर गेले आहे. या आधारावर चीनने उच्च मध्यमवर्गीय उत्पन्नाच्या देशाच्या श्रेणीत जागा राखून ठेवली आहे. अर्थात शहरातील श्रीमंत आणि ग्रामीण भागातील गरीबांची मालमत्ता यातील अंतर बरेच आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले की, 2035 मध्ये अर्थव्यवस्थेचा आकार हा दुप्पट होईल. परंतु यात काही अडचणी आहेत. अर्थव्यवस्था पूर्णपणे विकसित होण्यापूर्वीच चीनची लोकसंख्या म्हातारी होत चालली आहे. ही बाब चीनमध्ये अनेक वर्षांपासून लागू असलेल्या एकच मुलगा/मुलगी या कडक नियमांचा परिपाक आहे. चीनची अर्थव्यवस्था या स्थितीला योग्य रितीने हाताळू शकते की नाही, हे आताच सांगता येणार नाही. पक्षाचे कडक धोरण हे समाजाची किचकट होणारी रचना आणि वाढीवर परिणामकारक ठरेल की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

पुर्नबांधणी किंवा पुनर्रचना हा शब्द चीनच्या जुन्या गोष्टींना उजाळा देते. एकेकाळी आशिया खंडात तंत्रज्ञान आणि संस्कृती क्षेत्रात चीन आघाडीवर होते. परंतु चीनचे वंशज 19 व्या शतकात कमकुवत झाले आणि यादरम्यान चिनी सैनिक बलवान होऊ लागले. पश्चिमेतील देशांनी त्यांना क्षेत्रीय आणि व्यापाराच्या सवलीत देण्यासाठी प्रवृत्त केले. त्याचवेळी उर्वरित जगासाठी चीनच्या पुर्नबांधणीचा अर्थ काय होऊ शकतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

या संकल्पनेतून अनेक तर्क समोर येत आहेत. हा देश जगाचा आर्थिक विकास निश्चित करेल किंवा जगातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ होईल की दुसर्‍या देशांसाठी गुंतवणुकीचे मोठा स्रोत म्हणून निर्माण होईल किंवा सैनिक आणि उद्योगाची भीती दाखवून चीन लहान देशांना अडचणीत आणेल आणि तंत्रज्ञानाची चोरी करेल, असे आडाखे बांधले जात आहे. एवढेच नाही तर चीन आपल्या यशातून अन्य देशांना स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रेरित करेल आणि हे देश अमेरिकेने अंगिकारलेली लोकशाहीपासून दूर जातील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या