Friday, April 26, 2024
Homeधुळेज्येष्ठ विधीज्ञ प्रविणभाई शाह यांचे निधन

ज्येष्ठ विधीज्ञ प्रविणभाई शाह यांचे निधन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळ्याचे सुपुत्र आणि गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यशस्वीपणे वकीली व्यवसाय करणारे ज्येष्ठ विधीज्ञ प्रविणभाई मुकुटलाल शाह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

- Advertisement -

त्यामुळे वकीली क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.भाई या नावाने सुपरिचित असलेले अ‍ॅड. पी.एम शाह यांचा दिवाणी कायद्याचा गाढा अभ्यास होता.

कायद्यातील तरतुदींचे बारीक वाचन, पक्षकाराला न्याय मिळण्यासाठी त्या तरतुदींची मुद्देसूद मांडणी, संदर्भिय न्याय-निवाड्यांच्या आधारे केला जाणारा प्रभावी युक्तिवाद आदी वकीली कौशल्य भाईंकडे होती.

न्यायालयातील भाईंचा युक्तिवाद ऐकण्यासाठी कनिष्ठ वकील मंडळी आवर्जून उपस्थित राहत असत. वकीलांच्या प्रशिक्षण वर्गातील भाईंचे अनेक विषयांवरील दिवाणी मार्गदर्शन कायम आठवणीत राहणारे आहे. भाईंच्या जाण्याने वकीली क्षेत्रातील अभ्यासु व्यक्तीमत्व हरपले असल्याची प्रतिक्रीया अ‍ॅड. विनोद बोरसे यांनी व्यक्त केली.

दीवाणी क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला- ज्येष्ठ विधीज्ञ पी.एम शाह यांचे निधनाने आमच्या सारख्या जुनियर वकीलांनासाठी दीवाणी क्षेत्रातील मार्गदर्शक व एक दीवाणी क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे. सिनिअर कौन्सिल म्हणुन त्यांचा उच्च न्यायालयाने बहुमान केला होता.

सिनियर कौसिन्सल म्हणजे वकील पत्र दाखल न करता अर्जंटमॅटर मध्ये पक्षकारची बाजू ते न्यायालयात मांडु शकत होते. उच्च न्यायालयात, सर्वाच्च न्यायालयात वकीली करीत होते. आदर्श घोटाळा खटल्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सर्वाच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली होती, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. अमित दुसाणे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या