Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठ नागरिक राष्ट्राची संपत्ती

ज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठ नागरिक राष्ट्राची संपत्ती

इंजि. मनोहर पोकळे ( कार्याध्यक्ष, कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, पुणे )

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे, ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य तो सन्मान मिळावा, त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठांच्या सन्मानार्थ १ ऑक्टोबर हा दिवस जगभर ‘ज्येष्ठ नागरिक दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

- Advertisement -

सन १९८२ मध्ये व्हीएला येथे यूनोच्या जागतिक संबर्धन परिषदेत ज्येष्ठ नागरिकांचे धोरण देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर अंमलात आणावे, असा आग्रह धरण्यात आला होता. सन १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ अमलात आले. प्रत्येक राज्यांनी त्यांचे धोरण करावे असे ठरले.

ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी, सामाजिक सन्मान मिळण्यासाठी महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार जाहीर केले. त्याची चोख अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्व विभागांना निर्देश दिले आहेत.

सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६० वर्षे करण्यात आली आहे. या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीची स्थापना करून राज्य, जिल्हा, महापालिका, नगरपालिका अशा विविध स्तरांवर समित्यांचे गठन तसेच प्रत्येक उपविभागात संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निर्वाह प्राधिकरण स्थापन करण्यात आले. आई वडिलांची, जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्यात येईल, असे त्यात नमूद केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या हिताची काळजी घेऊन शासन आणि जनता सातत्याने प्रयत्न करीतच आहे. त्याचबरोबर सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कृतिशील व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या दीर्घ सेवेतील अनुभवाचा लाभ समाजाला मिळावा, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी ते कार्यरत रहावेत या उद्देशाने सन २०१४ साली पुणे येथे कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था स्थापन करण्यात आली. सार्वजनिक विश्वस्त कायद्याप्रमाणे संस्थेची नोंदणी झाली आहे. या संस्थेचे कार्य राज्यभर सुरू आहे.

कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी स्थापनेवेळी महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्य सचिव अरुण बोनगीरवार, पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, सचिव नंदकुमार जत्रे, र.ग. कर्णिक, भालचंद जोशी, इंजि. मनोहर पोकळ आदी संघटनाप्रेमी अग्रेसर होते. ही संस्था स्थापन करताना काही उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत.

त्यानुसार सेवानिवृत्तांना एकत्र आणून त्यांच्या ज्ञानाचा फायदा समाजाला करून देणे, समाज कार्यात परीत करणे, दैनंदिन जीवन सुखकर करणे, आरोग्यविषयक प्रश्नी चर्चासत्रे, संमेलने, व्याख्याने, परिसंवाद आयोजित करणे, ज्येष्ठांना, सेवानिवृत्तांना शासनाच्या सवलतींबाबत मार्गदर्शन करणे, सेवानिवृत्तांची प्रलंबित कामे करण्यास शासनास सहाय्य करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणे, पहिली ते बारावी पर्यंतच्या शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात मुख्य शिक्षणापैकी कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींशी आदरभाव व परस्पर सहकार्य, बंधुभाव व प्रेम आदी मुल्यांचे पाठ्यपुस्तकातील धड़यांद्वारे मुख्य शिक्षण देण्यात यावे तसेच संस्कारक्षम दात्यांनी वृद्धत्वाकडे योग्य दृष्टीकोन ठेवावा म्हणून समाजात जाणीव निर्माण करण्यासाठी ही संघटना काम करीत आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी माऊलींनी आपल्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायाच्या शेवटी सर्व विश्वाच्या कार्यासाठी देवाकडे ‘पसायदान’ मागितले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे…

किंबहुना सर्व सुखी! पूर्ण होऊनी तिन्ही लोकी,

भजिजो आदी पुरुखी! अखंडित ||

या पृथ्वीतलावरील सर्व लोकांनी संपूर्णपणे सुखी व्हावे, त्यांचे आयुष्यसंपन्न व्हावे, त्यांच्या हातून परमेश्वराची सेवा धडावी हाच हेतू ठेवून ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुखी, आनंदी करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या