Sunday, May 5, 2024
Homeनगरकोविडच्या दुसर्‍या डोसपासून अनेक ज्येष्ठ नागरिक वंचित

कोविडच्या दुसर्‍या डोसपासून अनेक ज्येष्ठ नागरिक वंचित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

कोविड लसीकरणाचा 45 वर्षापुढील नागरिकांचा दुसरा डोस देणे बाकी असताना उद्यापासून केवळ 18 ते 44 वर्षाआतील व्यक्तींच्या लसीकरणासाठी पहिला डोस आल्याने 45 वर्षापुढील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

शहरासह तालुक्यातील 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेऊन दोन महिने झाले आहेत परंतू त्यांना अद्याप दुसरा डोस दिला गेलेला नाही. लस उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना डोस न घेता घरी परतावे लागत आहे. सकाळपासून नागरिक ताटकळत उभे असतात. परंतू डोस न मिळाल्याने त्यांना मोठा मनस्ताप होत आहे. असे असताना आजपासून 18 ते 44 वर्षाआतील व्यक्तींच्या लसीकरणासाठी पहिला डोस उपलब्ध झाला आहे.

शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर येथे फक्त 18 ते 44 वर्षे या वयोगटासाठी लसीकरण सुरू होत असून सदर लसीकरण फक्त ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली आहे त्यांच्यासाठीच उपलब्ध आहे. ज्या 18-44 लाभार्थ्यांना अपॉइंटमेंट मिळाली नाही त्या लाभार्थ्यांना लस मिळणार नाही. असे ग्रामीण रुग्णालयकडून कळविणत आले आहे. उद्याचे लसीकरण हे फक्त 18 ते 44 या वयोगतासाठीच असून उर्वरित वय 45 वर्षाच्या पुढील लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी जावू नये, एखाद्या लाभार्थ्यास जर दुपारच्या सत्राची अपॉइंटमेंट मिळाली असेल तरीही त्यांनी सकाळीच लसीकरणासाठी यावे, असे कळविण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला असताना 18 ते 44 वर्षे या वयोगटासाठी लसीकरण सुरू होत असल्याने आम्ही अजून किती दिवस दुसर्‍या डोसची वाट बघायची असा प्रश्न करून ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दोन दिवसात दुसरा डोस येईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या