Tuesday, April 23, 2024
Homeधुळेधुळ्यात सेना-भाजपाची युती

धुळ्यात सेना-भाजपाची युती

धुळे । dhule । प्रतिनिधी

धुळे पं.स. सभापतीपद (P.S. Chairmanship) अनुसूचित जमाती महिला (Scheduled Tribe Women) या प्रवर्गासाठी राखीव (Reserved category) असल्याने मोहाडी गणातील भाजपाच्या सदस्या वंदना रतन मोरे (BJP member Vandana Ratan More) तर उपसभापतीपदी (deputy chairman) बोरकुंड पं.स. गणातील शिवसेनेचे सदस्य देवेंद्र गोकुळ माळी (Shiv Sena member Devendra Gokul Mali) हे विजयी (victorious) झाले. त्यांना प्रत्येकी 21 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना अवघ्या 9 मतांवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

धुळे पंचायत समितीच्या सन 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाच्या काही सदस्यांची संख्या कमी होवून ती 16 इतकी झाली. अर्थात आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडीसाठी 16 सदस्यांचे संख्याबळ असणे आवश्यक होते, ते भाजपाकडे होते. परंतु ऐनवेळी शिवसेनेचे बोरकुंड परिसरातील नेते बाळासाहेब भदाणे आपल्या पाच समर्थकांचे पाठबळ भाजपाला दिले. यामुळे सत्ताधारी भाजपाकडे 21 एव्हढे संख्याबळ झाले. सभापती पदासाठी मोहाडी गणातील वंदना मोरे यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केला. तर धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या मोघण गणातील मीनाबाई साहेबराव सोनवणे आणि चिंचखेडा गणातील मंगलाबाई लक्ष्मण भिल यांनी अर्ज दाखल केले. निर्धारीत मुदतीत मंगलाबाई भिल यांनी माघार घेतल्यानंतर मिनाबाई सोनवणे यांचा 9 मते मिळवून पराभव झाला.

उपसभापती पदासाठी बोरकुंडचे शिवसेनेचे सदस्य देवेंद्र माळी यांनी तर काँग्रेसतर्फे न्याहळोद गणातील योगराज प्रतापराव पवार यांनी अर्ज दाखल केला. यात देवेंद्र माळी यांना 21 मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर योगराज पवार यांना अवघे 9 मते मिळाली.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपाचे प्र्रा.अरविंद जाधव, राम भदाणे, रावसाहेब गिरासे, रितेश परदेशी, बापू खलाणे, आशुतोष पाटील, शिवसेनेचे बाळासाहेब भदाणे यांच्यासह समर्थकांची मोठी गर्दी होती. त्यांनी गुलाल उधळीत, ढोल ताशांच्या गजरात विजयाचा जल्लोष केला. भाजपाचे नेते पालकमंत्री, गिरीष महाजन, आ.जयकुमार रावल, खा.डॉ.सुभाष भामरे, अनुप अग्रवाल यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

विकास पॅटर्नला साथ

भाजपाकडे बहुमत असतांनाही भाजपने बोरकुंडचे बाळासाहेब भदाणे यांनी परिसरात केलेल्या विकासाच्या पॅर्टनला साथ दिली. म्हणूनच त्या परिसरातील सदस्यास उपसभापती पदाचा मान मिळाला, असा दावा बाळासाहेब भदाणे यांच्या समर्थकांकडून केला जातो आहे.

पाठिंबा देणारी सेना कोणाची?

बोरकुंडचे बाळासाहेब भदाणे यांचे समर्थक शिवसेनेच्या पाच सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र पाठिंबा देणारी ही शिवसेना कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाकरे गट असेल तर भाजपाला पाठिंबा कसा? अन्यथ ठाकरे गटाशी काडीमोड करुन बाळासाहेब भदाणे शिंदे गटात दाखल झालेत काय? असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या