Sunday, April 28, 2024
Homeनगरअतिक्रमण न हटविल्यास आत्मदहन

अतिक्रमण न हटविल्यास आत्मदहन

अहमदनगर (प्रतिनिधी) –

भिंगार येथील विजय लाईन चौकात दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन

- Advertisement -

पैश्यासाठी मानसिक त्रास देणार्‍या महिलेवर कारवाई करुन अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक व्यापारी सुमित कुमार संतोष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. संबंधित महिलेविरोधात कारवाई न झाल्यास दि. 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भिंगार येथील सुमितकुमार संतोष प्रसाद यांच्या दुकानासमोर एका महिलेने अतिक्रमण केले आहे. यापूर्वी हे अतिक्रमण प्रशासनाने हटविले होते. मात्र, या महिलेने पुन्हा अतिक्रमण केले आहे. ही महिला अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत असून, काही राजकीय पक्ष व संघटना सोबत घेऊन वारंवार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप सुमित कुमार यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या