विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे

jalgaon-digital
2 Min Read

निफाड। प्रतिनिधी | Niphad

मार्शल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट (Martial Training Institute of Martial Arts) (इंडिया) व शिवअविष्कार स्पोर्टस फाउंडेशन नाशिक (Shiva Avishkar Sports Foundation Nashik) तसेच पोलीस मित्र परिवार समन्वय समिती नाशिक (Police Friends Family Coordinating Committee Nashik) यांच्या संयुक्त विद्यमाने

येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थीनींना (students) सध्याच्या या आधुनिक युगात, धावपळीच्या जीवनात महिला व मुलींवर होणारे अत्याचार (Violence against women and girls) रोखण्यासाठी मुलींना स्व-संरक्षणाचे धडे (Lessons in self-defense) दिले जात आहे. यासाठी मुलींना स्व-संरक्षणाचे सोपे व निर्भीडपणे करता येणारे विविध डावपेच प्रशिक्षक विलास गायकवाड शिकवत आहेत.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत यांनी विद्यार्थीनींना आरोग्यविषयक (health) माहिती दिली. कराटेच्या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते. यातून मुली निश्चितच स्वत:चे संरक्षण करू शकतात. अलीकडे शाळांच्या माध्यमातून अगदी पहिलीच्या वर्गापासून मुलींना कराटेचे प्रशिक्षण (Karate training) दिले जाते. त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचे फायदे जाणून स्वरक्षणासाठी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. मुलींना सक्षम आणि खंबीर बनवून प्रतिकारक्षम केले गेले पाहिजे. कराटे हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता वेळ आली तर त्याचा उपयोग स्वसंरक्षणासाठी कसा करावा याचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत यांनी बोलताना व्यक्त केले.

जिल्ह्यातील व तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामीण भागातील गावागावात जाऊन मुलींना व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा विलास गायकवाड यांचा ध्यास आहे. यासाठी त्याची सुरुवात त्यांनी सरस्वती विद्यालयातील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थीनींपासून केली. सदर प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्याकरिता निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलाल चोरडिया, सरस्वती विद्यालयचे चेअरमन प्रवीण कराड, मार्शल आर्टचे अध्यक्ष अनिल जाधव, मोसिन मनियार, योगेश देशमुख,

सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती भागवत यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी निशिगंधा शिंपी, वैशाली काळे, प्रतिभा महाजन, सविता गुंजाळ, सोनाली मोते, ज्योती सांगळे, अश्विनी गांगुर्डे, शारदा काजळकर, छाया चव्हाण आदी शिक्षिका व पालक उपस्थित होते. याप्रसंगी निलम बेंडकुळे यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती विद्यालयात विद्यार्थीनींच्या कराटे प्रशिक्षणासाठी विलास गायकवाड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *