Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअवैध मद्यसाठा जप्त

अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पेठरोडवरील इनामबारी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने कारवर छापा टाकून वाहनासह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली आहेत.

- Advertisement -

दिलीपभाई मोतीसिंग वसावा (३३ रा.टेकरा फलिया जि.भुरूच राज्य गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत चालकाचे नाव आहे. यामुळे केंद्र शासित प्रदेश निर्मीत मद्याची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

पेठरोड मार्गे मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती दिंडोरीचे भरारी पथक क्र.३ चे दुय्यम निरीक्षक एस.एस.बागुल यांना मिळाली होती. उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी रात्री इनामबारी शिवारात दुय्यम निरीक्षक एस.बी.शिंदे जवान व्ही.आर.सानप, एस. एस. पानसरे, व्ही. ए. चव्हाण, व्ही.बी.पाटील, एस. एस. भांगरे, एम.पी.भोये व वाहनचालक एम. ए. खामकर आदींच्या पथकाने सापळा लावला होता.

संशयित इको कार (जीजे ०६ एचएल ९६५५) अडवून पथकाने ही कारवाई केली. संशयीत चालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता कारमध्ये ब्लेण्डर प्राईड,रॉयल चॅलेंज,मॅजिक मोमेट ओडका असा मद्यसाठा मिळून आला. या कारवाईत कारसह सुमारे ४ लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक बागुल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या