Saturday, April 27, 2024
Homeनगरबियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दुबार पेरणी - नवलाखा

बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दुबार पेरणी – नवलाखा

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

राज्यात पावसाची सुरवात झाल्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली व मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही.

- Advertisement -

याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्यांच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जा असल्यामुळे उगवण शक्ती कमी होती, त्यामुळे शेतकर्‍याला दुबार पेरणी करावी लागली आहे, असे आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जामखेड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. या परिसरातील शेतकर्‍यांना राज्य सरकारने तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अनेक भागात दुबार पेरणी झाली. सोयाबीन, मूग, उडीद हे पिके बर्‍यापैकी आले होते. परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झालीत. विदर्भात व इतर भागात सोयाबीनवर येलो मोजाक नावाची कीड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत आणि ते सोयाबीन कापणी विना नागरणी करावी लागली, हे वास्तविकता आहे.

गेल्या महिन्यात जास्ती पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड (पिक) सडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानव निर्मित पूर आल्यामुळे शेतकर्‍यांचे पिके पाण्याखाली आली होती.

तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही पूर्णपणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती तुटपुंजी आहे. दुसरीकडे मागील दोन कर्जमाफीमध्ये अनेक शेतकर्‍यांना कर्ज माफी झालेली नाही. एकूणच राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळणे गरजेचे आहे असे आम आदमी पार्टी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसान झालेल्या पिकांसाठी प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत, सोयाबीन, धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी, एम.एस.पी. नुसार सरकारी खरेदी चालू करावी, पूर्व विदर्भात मानव निर्मित पूरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकणात दिलेल्या मदतीप्रमाणे देण्यात यावी.

राज्यात जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, ज्या शेतकर्‍यांना मागच्या दोन कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यांना कर्ज माफी देण्यात यावी शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून वरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात. असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदनात म्हटलेआहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा, जामखेड तालुका अध्यक्ष बजरंग सरडे, अजय भोसले, रजनीकांत राळेभात, अ‍ॅड. बिपीन वारे, बाळू सुर्वे, काका रायकर, अतुल खराडे, सुभाष शिंदे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या