Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासुरक्षा रक्षक भरती घोटाळा प्रकरण: तक्रारदारांनी मागितली आत्मदहन ची परवानगी

सुरक्षा रक्षक भरती घोटाळा प्रकरण: तक्रारदारांनी मागितली आत्मदहन ची परवानगी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

दहा वर्षांपूर्वी झालेल्या सुरक्षारक्षक भरतीत घोटाळ्या (Scam in security guard recruitment) प्रकरणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना गच्छंती केल्याने

- Advertisement -

नोकरीवर गदा आलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल दहा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी आत्मदहनाची मागणी (Demand for self-immolation) केली आहे. सिडको कार्यालयात (CIDCO Office) (१ एप्रिल २०१३) नियमबाह्य सुरक्षारक्षक भरती (Security Guard Recruitment) करण्यात आली.

या भरतीत सर्व नियम डावलून ज्यांनी पैसे भरले त्यांना नोकरी देण्यात आली. व जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत होते त्यांची गच्छंती करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदांनी केला आहे. अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्षापासून अर्ज फाटे करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर आत्मदहन (self-immolation) करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

या सर्व भरती घोटाळ्याप्रकरणी विविध प्रकारे सत्य परिस्थिती मांडूनही सिडको महामंडळ, त्यांचे आधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कारवाई करत नसल्याने अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी अखेर स्वतः इच्छा मरणाची तयारी केल्याने या विषयाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. याबाबत आता तरी प्रशासन दखल घेईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे आहे सिडको भरती घोटाळा प्रकरण

१ एप्रिल २०१३ रोजी सिडकोत कार्यालय (CIDCO Office) नाशिक येथे सुरक्षा रक्षक भरती (Security Guard Recruitment) करण्यात आली. या भरतीमध्ये नियमबाह्य प्रकरण व भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे समोर येताच व्यवस्थापकीय संचालक सिडको मुंबई यांनी २०१८ साली त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले. या भरतीत खोटे कागदपत्रे सादर करून अनेक कर्मचारी यांनी पैसे भरून नोकरी मिळविली. याबाबत माहिती अधिकारात सर्व माहिती अन्यायग्रस्त कर्मचारी राजेंद्र कुलकर्णी व संजय आहिरे यांनी काढली असून सत्य परिस्थिती समोर आली आहे. याबाबत तत्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही.

मरेपर्यंत न्याय मिळेल का? मी सिडकोतील कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. केवळ पैसे दिले नाहीत म्हणून परत नोकरीवर घेतले नाही. ज्यांनी ही नोकर भरती पैसे घेऊन केली ते आज मोकाट आहेत. आम्हाला न्याय कधी मिळेल.

– संजय आहिरे, अन्याग्रस्त कर्मचारी सिडको.

तर आता आत्मदहनच करू आम्हाला १० वर्षांपासून न्याय मिळत नाही. आता वय वाढले इतके नुकसान झाले. संसार उघड्यावर आला. कुटुंब चालवायचे कसे? आता सहकुटूंब रीतसर आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे.

– राजेंद्र कुलकर्णी, अन्याग्रस्त कर्मचारी सिडको

- Advertisment -

ताज्या बातम्या