राष्ट्रवादीचा धर्मनिरपेक्ष विचार, वारसा जपावा: चोरमारे

jalgaon-digital
4 Min Read

ओझे । प्रतिनिधी | Oze

राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress) मूळ विचारधारा ही काँग्रेसचीच असून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या

आदर्शवत धर्मनिरपेक्ष विकासाभिमुख विचार व कामाचा वारसा यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) चालवत असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाच वारसा पुढे चालू ठेवावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केले.

दिंडोरी (dindori) येथील ओमसाई लॉन्स येथे आयोजित ‘वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा’ या एक दिवसीय शिबिराप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे बोलत होते. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nashik District Nationalist Congress Party) वतीने तालुकावार एक दिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात दिंडोरी येथून करण्यात आली. पुढे बोलताना चोरमारे म्हणाले की सरकार विरोधकांना नामहरण करण्यासाठी सीबीआय (CBI), इडी (ED), इन्कमटॅक्स (Income Tax), पोलीस (police) आदी विविध यंत्रणेचा वापर करत असून, जनतेचा या संस्थासोबतच न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचेबाबत चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न सातत्याने भाजप (BJP) व आरएसएसच्या विचारसरणीचे लोक करत आहे. या प्रकारांना थोपविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायला हवे. शरद पवार यांनी सातत्याने धर्मनिरपेक्षता (Secularism) जपत समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहे कार्यकर्त्यांनी हेच काम सुरू ठेवणे पक्षाला अभिप्रेत असणार आहे असे चोरमारे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी अपशब्द वापरून महाराजांचा इतिहास बदलण्याची स्पर्धाच भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) नेत्यांमध्ये सुरु असून याची पुनरावृत्ती झाल्यास सहन केले जाणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी दिला आहे. यावेळी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे (Kadwa Chairman Sriram Shete) यांनी सांगितले की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकर्‍यांसह समाजातील सर्व घटकांचे विकासाचे काम केले आहे. त्यामुळे पक्षाला जनतेचे मोठे पाठबळ आहे ते टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करत समाजभिमुख काम करावे, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.

कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करतांना श्रीराम शेटे हे शांत, संयमी व कर्तृत्ववान नेतृत्व असून राज्य साखर संघाच्या माध्यमातून ते राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटवित असल्याचेही अ‍ॅड. पगार यांनी सांगितले.कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे 76 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विविध मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, आमदार डॉ. सुधीर तांबे, जेष्ठ नेते गणपतराव पाटील, दिंडोरी बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, निरीक्षक जगदिश पवार, कादवा कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, व्ही.जे.एन.टी. सेलचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सैयद, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील,

विश्वासराव देशमुख, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, प्रा. लक्ष्मण महाडिक युवक तालुकाध्यक्ष शाम हिरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उफाडे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी अनिल देशमुख, लता बोरस्ते, कैलास मवाळ, भाऊसाहेब बोरस्ते, माधवराव साळुंखे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता राऊत, कविता पगारे, योगराज रौंदळे, गोकुळ झिरवाळ, आबासाहेब देशमुख, किशोर वडजे, अनिल देशमुख आदीं उपस्थित होते.

लक्ष विचलित करण्यासाठी राऊतांवर कारवाई

केंद्र सरकारविरोधी जे नेते आक्रमक आहेत त्यांचे विरोधात केंद्रीय संस्थाचा वापर करत कारवाई करत आहे. त्यासाठी टायमिंग साधत आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वर रविवारी झालेली इडीची कारवाई ही तत्पूर्वी राज्यपाल यांनी गुजरात, राजस्थान वरून केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रीयन जनतेत रोष निर्माण झाला होता. त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत यांचेवर कारवाई करत जेलमध्ये टाकले. मात्र, कोर्टाने ही कारवाई कशी चुकीची होती ते सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *