Tuesday, April 23, 2024
Homeजळगावसीईटी परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 (1) (2) लागू

सीईटी परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 (1) (2) लागू

जळगाव – Jalgaon

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, 2020 (MHT-CET) ही ऑनलाईन पध्दतीने 1 ऑक्टोबर, 2020 पासून जळगाव जिल्हयात घेण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

या परिक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी, जळगाव अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) खाली प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

दि.1 ते 9 ऑक्टोबर, 2020 व दिनांक 12 ते 20 आक्टोंबर, 2020 पर्यंत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही. तसेच परिक्षा केंद्रा जवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन/ एस.टी.डी/ आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावेत. असे जिल्हादंडाधिकारी जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या