Wednesday, April 24, 2024
Homeनगरमढेवडगाव सेवा संस्थेचे सचिव अढागळे अखेर निलंबित

मढेवडगाव सेवा संस्थेचे सचिव अढागळे अखेर निलंबित

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील मढेवडगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव राजू पोपट अढागळे यांच्यावर कार्यालयीन आदेशाची अवमान्यता व कर्तव्यात कसूर

- Advertisement -

केल्यामुळे व बदलीचे आदेश न जुमानल्यामुळे अखेर जिल्हास्तरीय समितीने दि.29 रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सेवामुक्त केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेतील सचिव राजू अढागळे यांच्यावर बोगस कर्ज, सभासदांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणे, परस्पर व्याज माफ करणे,वर्ग-3 जमिनीवर बोगस गृहकर्ज, संचालकांच्या वैयक्तिक हिताचे धोरण राबविणे यासारख्या असंख्य तक्रारी होत्या. याबाबत अंबादास सोनबा मांडे व काही कर्जदार सभासदांनी श्रीगोंदा सहाय्यक निबंधक, जिल्हा निबंधक व आयुक्त सहकार विभाग पुणे यांच्याकडे वारंवार तक्रारी,उपोषणे केली होती.

प्राथमिक चौकशीत सचिवांवर ठपका ठेवून सहाय्यक निबंधक व जिल्हास्तरीय समितीने त्यांची बदली तीन महिन्यांपूर्वी बेलवंडी कोठार येथे केली होती. तर त्यांच्या जागेवर कोरेगव्हाण सेवा संस्थेतील एस. बी. पवार यांची नियुक्ती केली होती. पण मढेवडगाव संस्थेतील सचिव अढागळे हे बदलीचे आदेश मिळूनही आदेशाला केराची टोपली दाखवत त्याच जागेवर चिकटून बसले होते. याप्रकरणी अंबादास मांडे यांनी अप्पर सहकार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याची तातडीने दखल घेत अप्पर आयुक्त यांनी श्रीगोंदा सहाय्यक निबंधक यांना सूचना करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही अढागळे वेगवेगळी करणे सांगून आदेश झिडकारत राहिल्याने अखेर जिल्हास्तरीय समितीने त्यांना निलंबित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या