Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट शक्य

मुंबईत दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट शक्य

मुंबई –

मुंबईत करोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा टाटा इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी यासाठी दिवाळीनंतरचा काळ

- Advertisement -

धोक्याचा असल्याचे म्हटले आहे.

मुंबईला पुढील महिन्यात करोनाचा मोठा धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. मात्र, जानेवारीपेक्षा नोव्हेंबरमध्ये करोनाची तयारी असलेली हॉस्पिटल जास्त आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर 26 च्या माहितीवरून टीआयएफआरच्या टीमने हा निष्कर्ष काढला आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात 80 टक्के झोपडपट्टी आणि 55 टक्के अन्य रहिवाशांमध्ये हर्ड इम्युनिटी जानेवारी 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तीन वॉर्डमध्ये करोनाने संक्रमित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यावरून गणपतीनंतर जशी करोनावाढीची लाट आली तशीच दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे. ही लाट मागील लाटेपेक्षा छोटीही असू शकते, असे टीआयएफआचे प्राचार्य डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीमध्ये अधिकाधिक मुंबईकर करोनामुळे धोक्यात होते, यामुळे त्यांच्यात कमी अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. यामुळे ही लाट थोडीफार छोटी असेल, असे ते म्हणाले.

हा नवा अंदाज नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्याच्या निर्णयाला विचारात घेवून व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये शाळा, कॉलेज सुरु झाल्यास हॉस्पिटलायझेशनमध्ये फारशी वाढ होणार नाही. परंतू जानेवारीपेक्षा नोव्ंहेबरमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर रुग्णांची संख्या जास्त असेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

हॉस्पिटलायझेशनमध्ये दिवसाला 2300 ते 3200 रुग्ण वाढ होऊ शकते. तर जानेवारीत हीच वाढ 200 ते 2000 असू शकते. 1 नोव्हेंबरपासून काही गोष्टी खुल्या झाल्याने 20 ते 30 रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, तर जानेवारीत 4 ते 20 मृत्यू होऊ शकतात, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या