Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुसर्‍या लाटेत 608 नगरकरांचा मृत्यू

दुसर्‍या लाटेत 608 नगरकरांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर (After the first wave of corona) आलेली शिथीलता, लोकांनी सण-उत्सवात केलेली गर्दी (Crowd) , यामुळे दुसर्‍या लाटेची दाहकता नगरकरांनी चांगलीच अनुभवली. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत 608 नगरकरांचा करोनाने बळी (Covid 19 Death) घेतला. तर 33 हजार 551 लोकांना करोनाचे निदान झाले. दुसर्‍या लाटेत पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांबरोबर मृतांचे प्रमाण मोठे होते. जूनमध्ये यात घट होऊन 583 बाधित समोर आले, तर एकाही नगरकराचा करोनामुळे मृत्यू (Nagar Covid 19 Death) झाला नाही. सध्यातरी नगर शहरात (Nagar City) रुग्णसंख्या कमी असली तरी ती कधी वाढेल याची भीती सतावत आहे. करोनावर मिळालेले नियंत्रण टिकवायचे असेल तर नगर शहरवासीयांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

- Advertisement -

पहिल्या लाटेत महापालिका प्रशासनाने (Municipal administration)सुरू केलेले कोविड सेंटर लाट ओसरताच बंद केले. दुसरी लाट एवढी भयानक येईल याची कल्पना कोणी केली नव्हती. प्रशासनाकडूनही म्हणावे तसे नियोजन झाले नव्हते. सण-उत्सव धडाक्यात झाल्याने फेब्रुवारीत बाधितांची संख्या वाढायला लागली. मार्चमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असताना नगर शहरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते.

ग्रामीण भागातून नगर शहरात उपचार घेण्यासाठी येणार्‍यांचे प्रमाण मोठे होते. यामुळे संसर्ग वेगाने फैलावला. मार्चमध्ये शहरात साडेपाच हजार बाधित समोर आले. ते प्रमाण एप्रिलमध्ये तीनपट वाढले. एप्रिलमध्ये 18 हजार 828 रुग्णांना करोना झाला. 478 नगरकरांचा मृत्यू झाला. बाधितांचे प्रमाण मे महिन्यात कमी होऊन नऊ हजारांवर आले.

स्मशानभूमीतील दाहकता

दुसर्‍या लाटेत नगर शहरातील रुग्णसंख्या वाढत होती. मृतांचे प्रमाणही वाढत होते. याचवेळी नगर शहरातील जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणार्‍यांचे प्रमाण जास्त होते. उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जात होते. नालेगावच्या अमरधामसह केडगाव, बोल्हेगाव व नंतर सावेडी येथील जुन्या कचरा डेपोच्या ठिकाणी अंत्यसंस्काराची सोय केली होती. स्मशानभूमीसमोर रुग्णवाहिकेच्या रांगा, अंत्यविधीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा, एकाचवेळी अनेकांवर होणारे अंत्यसंस्कार या सर्व गोष्टी मन सुन्न करणार्‍या होत्या.

पॉझिटीव्ह रुग्णसंख्या, कंसात मृत्यू

मार्च- 5797 (89)

एप्रिल- 18828 (478)

मे- 8926 (41)

जून- 583 (00)

- Advertisment -

ताज्या बातम्या