२ दुकाने सील, ६ दुकानदारांकडून १३ हजारांची वसुली

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

मनपाच्या अतिक्रमण पथकाने शनिवारी शहरातील फुले मार्केट, सरस्वती डेअरीजवळील परिसर, गोलाणी परिसरात धडक कारवाई करीत मद्रास बेकरीसह गोलाणीतील एक दुकान असे दोन दुकाने सील केली तर 6 दुकानदारांकडून प्रत्येकी 2 व 5 हजाराप्रमाणे दंडात्मक कारवाई करीत 13 हजाराची वसुली करण्यात आली. पथकातील संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे आदींनी ही कारवाई केली.

अतिक्रमण पथकाने शनिवारी आपली मोहीम सुरूच ठेवली. शनिवार व रविवारी दुकाने बंद राहतील असा प्रशासनाचा स्पष्ट आदेश असतांना तसेच मनपा यावर अंमलबजावणी करीत कारवाई करीत असतांनाही दुकानदार, नागरिक हे जुमानत नसल्याचे व संबंधित आदेशाला केराची टोपली दाखवून नियम व अटी शर्तिंचे सर्रासपणे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. वारंवार दुकाने सील करणे, दंडात्मक कारवाई करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, शनिवार, रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना दुकाने उघडी ठेवतात यामुळे मनपा अतिक्रमण पथकाला कारवाई करावी लागते.

शहरातील चित्रा चौकातील हंबर्डीकर बेकरी व त्यालगतची दोनतीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई 2 हजार पासुन ते 5 हजारापर्यतच्या रकमेची होती. जवळपास 6 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच गोलाणी मार्केटमध्येही शनिवारी, मोबाईलचे दुकान उघडे आढळले. त्यास 5 हजाराचा दंड करण्यात आला. एक दुकान उघडे झाले की दुसरा दुकानदारही दुकान उघडे करतो असा प्रकार गोलाणी मार्केटमध्ये असतो. बरेच जण दुकानातून माल काढतात व तो ओट्यावर बसून विकतात असेही आढळून आले आहे.

फुले मार्केटमध्ये तुतूमेमै

फुले मार्केट परिसरात तसेच फुले मार्केटमध्ये फूटपाथधारक हे दुकाने फुटपाथवर लावत होते. तसेच टॉवर परिसरातही अनेक जण रस्त्यावर दुकाने लावून होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *