Friday, April 26, 2024
Homeनगरशिल्पकार कांबळे यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार

शिल्पकार कांबळे यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) 73 व्या वर्धापनदिनानिमित्त नगरमधील (Nagar) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे (Famous painting sculptor Pramod Kamble) यांना विद्यापीठातर्फे जीवन साधना पुरस्काराने (Jeevan Sadhana Award) सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे (Veteran actor Dr. Mohan Agashe) यांच्या हस्ते प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना प्रमोद कांबळे म्हणाले, कलाकाराने नेहमीच नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे व आपली निष्ठा कलेप्रती असली पाहिजे. गुरुजन, वडिलांची हिच शिकवण अंमलात आणत या क्षेत्रात योगदान देत आहे. देशात प्रतिष्ठित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी कायम अनमोल ठेवा राहिल.

- Advertisment -

ताज्या बातम्या