Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाICC T20 World Cup : स्कॉटलंड, अफगाणिस्तान आज भिडणार

ICC T20 World Cup : स्कॉटलंड, अफगाणिस्तान आज भिडणार

शारजाह | Sharjah

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट (ICC T20 World Cup) स्पर्धेत आज सोमवारी स्कॉटलंड (Scotland) आणि अफगाणिस्तान (afghanistan) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना शारजाह येथे होणार आहे…

- Advertisement -

अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात आतापर्यंत ६ टी २० सामने खेळले गेले असून अफगाणिस्तान संघाने ६ सामन्यांमध्ये स्कॉटलंड संघाला पराभवाची धूळ चारली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आपली विजयी परंपरा अशीच कायम ठेवण्याच्या इराद्याने अफगाण संघ आज मैदानात उतरणार आहे.

दुसरीकडे स्कॉटलंड क्रिकेट संघाने पात्रता फेरीतील आपले सामने जिंकले असल्यामुळे आपली विजयी मोहीम कायम ठेवण्यासाठी स्कॉटलंड आज मैदानात उतरेल. अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद अष्टपैलू मोहंमद नाबीकडे असणार आहे. तर स्कॉटलंड संघाचे कर्णधारपद काईल कॉट्झर निभावणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या