Saturday, April 27, 2024
Homeनाशिकथरारक ! जेव्हा चालत्या स्कार्पिओने घेतला अचानक पेट

थरारक ! जेव्हा चालत्या स्कार्पिओने घेतला अचानक पेट

इगतपुरी । Igatpuri

मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात स्कार्पिओ गाडीला अचानक आग लागल्याने या घटनेत वाहन जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने वाहन चालकासह एक जन सुरक्षित बचावला. या घटनेने महामार्गावरील दुतर्फा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

- Advertisement -

मुबंईहुन नाशिकला जाणारी स्कार्पिओ वाहन क्रमांक एम. एच. 43 – ए. 1215 या वाहनाचा अचानक धूर निघत असल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने गाडी रस्त्याच्या कडेला गाडी लावून प्रसंगवधान साधून गाडी उभी केली असता काही वेळेतच सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान गाडीने अचानक पेट घेतल्याने या आगीत संपुर्ण गाडी जळुन खाक झाली.

महामार्ग सुरक्षा पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर वाहनाला लागलेली आगीची घटना पोलीसांना समजताच पोलीस पथक घटनास्थळी येऊन जवळच असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाला भ्रमणध्वनी करून घटनास्थळी पाचारण केल्याने वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तो पर्यंत गाडी जळून गेली होती.

वाहन चालक सय्यद अब्दुल सलाम व सहकारी अकिब शेख, राहणार कल्याण ( मुबंई ) या दोघांनी सतर्कता बाळगल्याने दोघांचे प्राण वाचले. या घटने दरम्यान मुबंईहुन नाशिक कडे जाणारी वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. महामार्ग पोलीसांनी काही वेळेतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी माधव पवार, पोलीस कर्मचारी सुनील खताळ, जितेंद्र विणकर, राहुल सहाणे, केतन कापसे, जयहरी गांगुर्डे यांनी महामार्गावरची वाहतुक एका बाजुला थांबवुन घटनास्थळी मदत कार्य सुरू केले.

महिंद्रा कंपनी अग्निशमन दलाचे सुरक्षा अधिकारी प्रतीक पांडे, अजय म्हसने, महेंद्र भटाटे, प्रदीप राजपूत ,केदार औधकार, अनिल शिंदे, नगरपालिका अग्निशमन दलाचे नागेश जाधव, कृष्णा गायकवाड आदींनी घटनास्थळी आग आटोक्यात आनण्यासाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या