Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशप्रथमच मिळाले सौर मंडळाबाहेरील ग्रहावरुन संकेत

प्रथमच मिळाले सौर मंडळाबाहेरील ग्रहावरुन संकेत

वॉशिग्टंन

सौर मंडलात अजूनही कुठेतरी जीवसृष्टी असू शकते, यावर बऱ्याच कालावधीपासून संशोधन सुरु आहे. शास्त्रज्ञ परग्रहावर असणाऱ्या सजीवांना संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत असतात. आता विज्ञान जर्नल ‘ऐस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स’ प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे सौर मंडलात जीवसृष्टी असण्याचे संकेत मिळाले आहे. शास्त्रज्ञांना सौर मंडळाबाहेरुन प्रथमच रेडिओ संकेत मिळाले आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील कॉर्नेल यूनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ जेक डी टर्नर यांनी म्हटले की, ‘रेडिओ संकेतामुळे प्रथमच सौर मंडळाबाहेरील ग्रहावरुन पहिला संदेश मिळाला आहे. हा संकेत Tau Bootes प्रणालीने मिळाला आहे.’ यामुळे सौर मंडळाबाहेरील ग्रहाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा संदेश ५१ प्रकाशवर्ष लांब असलेल्या ग्रहावरुन मिळाला आहे.ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रातून हे रेडिओ सिग्नल येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेदललँडमध्ये असलेल्या दुर्बिनेने लो फ्रिक्वेंसी अर्रे (लोफर) चा वापर करत टाउ बूट्स तारेच्या प्रणालीमधून हे रेडिओ संदेश मिळवले आहे. ज्या ठिकाणाहून संदेश मिळाले आहे त्याच्या जवळहून गॅसने असलेला ग्रह चक्कर मारत आहे.

सौरमंडळाबाहेरुन प्रथमच मिळाला रेडिओ संकेत

५१ प्रकाशवर्ष लांब असलेल्या ग्रहावरुन आला संकेत

ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रातून हे रेडिओ सिग्नल येत असल्याची शक्यता

- Advertisment -

ताज्या बातम्या