Friday, April 26, 2024
Homeनाशिकऑक्टोबरमध्ये आहारशास्त्रावर वैज्ञानिक महाकुंभ

ऑक्टोबरमध्ये आहारशास्त्रावर वैज्ञानिक महाकुंभ

नाशिक | Nashik

विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटीच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थी विज्ञान मंथन २०२० – २१’ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी यासह अन्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या परीक्षेचे आयोजन केले जाते. या वर्षी स्पर्धा परिक्षेबरोबरच ‘आहारशास्त्र आणि पर्यावरण’ अशा अनोख्या संकल्पनेवर आधारित भारतातील पहिल्या वैज्ञानिक महाकुंभाचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात केले आहे.

यात विद्यार्थी स्वतःच्या दैनंदिन भोजनामध्ये समाविष्ट असणाऱ्या अन्न पदार्थांचे पोषण मूल्य आणि त्याचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव यावर प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारे अनुमान मांडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील परीक्षा २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी डिजिटल माध्यमाद्वारेे घेण्यात येईल. या परीक्षेत विविध वैज्ञानिक आणि गणितीय विषयांवर आधारित १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक अभ्यासक्रम व परीक्षेत सहभागी होण्यासाठी शाळांना आणि विद्यार्थ्यांना www.vvm.org.in या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. वरील संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या